jammu kashmir security forces
jammu kashmir security forces  Danik Gomantak
देश

काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, लष्कराने दहशतवाद्याचा केला खात्मा

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दल सीमेपलीकडून होणाऱ्या प्रत्येक घुसखोरीवर बारीक नजर ठेवून आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराचा असाच प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील तंगधार भागात दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते, मात्र लष्कराच्या जवानांच्या तत्परतेमुळे ते शक्य झाले नाही. सध्या या प्रकरणी कारवाई सुरू आहे. (Kashmir Infiltration)

लष्कराने दहशतवाद्याला ठार केले असे सांगण्यात आले आहे. घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, किती दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते, हे स्पष्ट झालेले नाही. लष्कराच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत घुसखोरीच्या घटना पूर्णपणे थांबल्या आहेत, तर कितीही वेळा दहशतवाद्यांनी असे प्रयत्न केले तरी ते हाणून पाडण्यात आले आहेत. त्याचबरोबर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराची कारवाई सातत्याने सुरू आहे.

यापूर्वी लष्कराच्या वतीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घुसखोरीबाबत सांगितले होते की, घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय जवान पूर्णपणे सतर्क आहेत.“LOC वर तैनात आमचे सैनिक पूर्णपणे सतर्क आहेत. शत्रूने घुसखोरीचा कोणताही प्रयत्न केला तर तो आम्ही 100 टक्के हाणून पाडू," असे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC), 16 व्या कॉर्प्स, लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग यांनी 2022-2023 साठी स्पोर्ट्स कॅलेंडर जारी करताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT