PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

Pahalgam Attack: मोदी सरकारचा पाकिस्तानला झटका! सिंधू जल करार स्थगित, अटारी सीमा बंद; पाच महत्वाचे निर्णय

Pahalgam Terror Attack: पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली सीसीएसची बैठक अडीच तास चालली.

Pramod Yadav

Pahalgam Terror Attack

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेले पाच महत्वाचे निर्णय

१) सिंधू जल करार स्थगित

२) अटारी सीमेवरून वाहतूक बंद

३) पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडावा.

४) भारतातील पाकिस्तानी दूतावासही बंद. पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांनी ७ दिवसांत देश सोडावा.

५) पुढील निर्णयापर्यंत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा दिला जाणार नाही.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बैसरण खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा हल्ला झाला. मृतांमध्ये यूपी, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशा येथील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि यूएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिकांचाही मृत्यू झाला.

सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद हा पाकिस्तानमध्ये आहे. या हल्ल्यात पाच दहशतवादी सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यातील दोन स्थानिक तर तीन पाकिस्तानी दहशतवादी होते, असे गुप्तचर सूत्रांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT