indira gandhi Dainik Gomantak
देश

'इंदिरा गांधींनीच पहिल्यांदा दिले होते अल्पसंख्याकांविरुध्द बुलडोझर चालवण्याचे आदेश'

देशात बुलडोझरच्या वापरावरुन शाब्दिक युद्ध सुरु असताना, भाजपने (BJP) रविवारी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.

दैनिक गोमन्तक

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून हनुमान चालिसा, बुलडोझर आणि भोंग्याभोवती फेर धरत आहे. यातच आता देशात बुलडोझरच्या वापरावरुन शाब्दिक युद्ध सुरु असतानाच, भाजपने रविवारी काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला. भाजपनं म्हटलं की, 'तुर्कमान गेटवरील अल्पसंख्याकांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश इंदिरा गांधींनीच (Indira Gandhi) दिले होते.' (Indira Gandhi was who first ordered use of bulldozers on minorities at Turkman Gate)

दरम्यान, ट्विटच्या माध्यमातून, भाजपच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय म्हणाले, "काँग्रेस पक्षातील मनीष तिवारीपासून राहुल गांधींपर्यंत सर्वांनाच स्मृतीभ्रंश आहे की, त्यांना त्यांच्या स्वत:च्या कृष्णकृत्याबद्दल माहिती आहे का? भूतकाळ? नाझी आणि ज्यूंना विसरा, भारतात (India) इंदिरा गांधींनीच पहिल्यांदा तुर्कमान गेटवर अल्पसंख्याकांवर बुलडोझर चालवण्याचा आदेश दिला होता.''

तसेच, "एप्रिल 1976 मध्ये, आणीबाणीच्या काळात, इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांनी मुस्लिम स्त्री-पुरुषांना सक्तीने नसबंदी करण्यास भाग पाडले होते. त्यांनी विरोध केला तेव्हा तुर्कमान गेटवर बुलडोझर चालवण्याचा आदेश देण्यात आला. त्यात 20 लोक मरण पावले.

दुसरीकडे, रविवारी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारींनी ट्विटरवर त्यांनी लिहिलेला लेख शेअर करत म्हटले की, "नाझींनी ज्यूंच्या नरसंहार केला. ज्यूंनी नंतर बुलडोझरचा वापर पॅलेस्टिनींविरुध्द केला. आता भारत सरकार स्वतःच्या फायद्यासाठी बुलडोझरचा वापर अल्पसंख्याकांविरुद्ध करत आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT