Ban On Chinese Apps Dainik Gomantak
देश

Ban On Chinese Apps: चीनी अ‍ॅप्सवर भारताचा डिजिटल स्ट्राईक; तब्बल 'इतक्या' अ‍ॅप्सवर घातली बंदी...

बेटिंग (सट्टेबाजी) आणि ऑनलाईन लोन (कर्ज) देणाऱ्या अ‍ॅप्सचा समावेश

Akshay Nirmale

Ban On Chinese Apps: केंद्र सरकारने चीनी अ‍ॅप्सवर पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक चढवला आहे. या वेळी भारताने चिनच्या सुमारे सव्वा दोनशे अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात विशेष करून बेटिंग (सट्टेबाजी) आणि ऑनलाईन लोन (कर्ज) देणाऱ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. यात 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि 94 लोन अ‍ॅप्सचा समावेश आहे. या अ‍ॅपमध्ये चीनी लिंक्सचा वापर केल्याचे समजते.

चायनीज लिंक्ससह बेटिंग आणि कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सच्या विरोधात एक मोठे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. केंद्र सरकारने 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि कर्ज देणार्‍या 94 अ‍ॅप्सवर तात्काळ बंदी आणून ही अ‍ॅप्स ब्लॉक करणे सुरू केले आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या अ‍ॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देश मिळाले आहेत. त्यानंतर संबंधित मंत्रालयाने ही अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी चिनी कर्ज देणाऱ्या 28 अ‍ॅप्सची चौकशी सुरू केली होती. तपासात आढळून आले की अशी 94 अ‍ॅप्स ई-स्टोअरवर आहेत. लोकांना कर्जात अडकवण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो.

या अ‍ॅप्सचा हेरगिरी आणि प्रचाराची साधने म्हणूनही गैरवापर केला जाऊ शकतो. भारतीय नागरिकांच्या डेटाची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. तेलंगणा, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला या अ‍ॅप्सवर कारवाई करण्यास सांगितले होते.

ही अ‍ॅप्सचा वापर हेरगिरीसाठी होण्याची शक्यता आहे. कारण या अ‍ॅप्समध्ये भारतीयांचा महत्त्वाचा डेटा आहे. अशा डेटाचा पाळत ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. ही सर्व अ‍ॅप्स चीनी बनावटीची आहेत. लोकांना कर्जाचे प्रलोभन दाखवून वार्षिक व्याज 3,000 टक्क्यांपर्यंत वाढवले.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये कर्जाच्या अ‍ॅप्सच्या भुलभुलैय्यात अडकून अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या. आता ही अ‍ॅप्स 'इमर्जन्सी ब्लॉक' करण्याच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कारवाई सुरू केली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऑनलाइन जाहिरात मध्यस्थांना भारतीय प्रेक्षकांसाठी अशा जाहिराती देऊ नयेत, असा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT