Indian Navy Dainik Gomantak
देश

Indian Navy Day 2021: देशात साजरा केला जातोय नौदल दिन, जाणून घ्या ऑपरेशन ट्रायडेंट

देशात दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. दरवर्षी नौदल दिनी, भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धाचे स्मरण केले जाते.

दैनिक गोमन्तक

भारतीय नौदल दिन 2021: देशात दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन (Navy day) साजरा केला जातो. दरवर्षी नौदल दिनी, भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील 1971 च्या युद्धाचे स्मरण केले जाते. तो भारतीय नौदलाच्या अविस्मरणीय विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी नौदलाच्या शूर योद्धांचेही स्मरण केले जाते, ज्यांच्या शौर्याने आणि युद्धकौशल्याने भारताचा विजय निश्चित झाला. 3 डिसेंबरला पाकिस्तानी लष्कराने आपल्या लढाऊ विमानांद्वारे आपल्यावर हल्ला केला. या हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 चे युद्ध सुरु झाले.

दरम्यान, 'ऑपरेशन ट्रायडंट' (Operation Trident) च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी भारतीय नौदलावर सोपवण्यात आली होती. ऑपरेशनच्या सुरुवातीला, कराचीतील पाकिस्तानी नौदलाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर कराचीच्या किनारपट्टीवर जहाजांच्या एका गटावर भीषण हल्ला झाला. या युद्धात प्रथमच जहाजावर जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. भारतीय नौदलाने आपल्या पराक्रमाने अनेक पाकिस्तानी जहाजे पाण्यात बुडवली होती.

आग 60 किमी अंतरावरुन दिसत होती

भारतीय नौदलाने मोठ्या सामरिक कौशल्याने कराचीतील बंदरातील इंधनसाठा उद्ध्वस्त केला होता. कराचीतील तेल टँकरला लागलेली आग इतकी भीषण होती की, ती 60 किमी दूरपर्यंत दिसत होती. कराचीतील तेल डेपो सात दिवसांपासून जळत होता.

म्हणूनच 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो

भारताने 1971 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. नौदलाच्या 'ऑपरेशन ट्रायडंट'नंतरच पाकिस्तानला आपला पराभव निश्चित वाटू लागला होता आणि प्रत्येक क्षणाला त्याचे धैर्य तुटत होते. 'ऑपरेशन ट्रायडेंट' अंतर्गत, भारतीय नौदलाने 4 डिसेंबर 1971 रोजी कराचीच्या नौदल तळावर हल्ला केला. या यशस्वी ऑपरेशनमुळे दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT