Jasprit Bumrah Dainik Gomantak
देश

Jasprit Bumrah Record: 'यॉर्कर किंग' बुमराहनं दिल्ली कसोटीत रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. आज, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामन्याचा पहिला दिवस आहे. यजमान कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दिल्लीच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली.

जसप्रीत बुमराहने अरुण जेटली स्टेडियमवर एकही चेंडू न टाकता एका खास यादीत प्रवेश केला आहे. जसप्रीतने १० ऑक्टोबर रोजी आपला ५० वा कसोटी सामना खेळला. यासह, तो तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज बनला.

अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय क्रिकेटपटूही बनला. त्याच्या आधी एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि केएल राहुल आहेत.

जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, त्याची टी२०, त्यानंतर एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आणि २०१८ मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले.

त्याने भारतासाठी ५० कसोटी सामन्यांमध्ये २२२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४९ आणि ७५ टी२० सामन्यांमध्ये अनुक्रमे ९६ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, शुभमन गिलने अखेर सहा सामन्यांनंतर नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाने एक विकेट गमावून १६८ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल ८४ धावांवर फलंदाजी करत आहे, तर साई सुदर्शनने ३६ चेंडूत १६ धावा केल्या आहेत. लेखनाच्या वेळी, दोघांनी ४७ धावांवर खेळत आहे. केएल राहुलला जोमेल वॉरिकनने ३६ धावांवर बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT