Indian Army Truck Dainik Gomantak
देश

Indian Army Truck Catches Fire: पूंछमध्ये भीषण अपघात, लष्कराच्या ट्रकवर कोसळली वीज; 3-4 जवानांच्या मृत्यूची भीती

Sky Lightning on Army Truck: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. वीज पडल्याने राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या ट्रकने पेट घेतला.

Manish Jadhav

Sky Lightning on Army Truck: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. वीज पडल्याने राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या ट्रकने पेट घेतला. या दुर्घटनेत 3-4 जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रकवर वीज कोसळली तेव्हा ते जम्मू-पुंछ महामार्गावरुन भाटा ढड्या परिसरातून जात होते.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये 10-12 जवान होते. ट्रकवर वीज पडल्यानंतर ट्रकने पेट घेतला आणि त्यात बसलेले जवान जळून खाक झाले. जखमी जवानांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या वाहनात शस्त्राशिवाय डिझेलही होते, त्यामुळे आग आणखी भडकली. हा अपघात झाला त्यावेळी परिसरात पाऊस सुरु होता, मात्र तरीही ट्रकची आग आटोक्यात येऊ शकली नाही.

तसेच, लष्कर आणि पोलीस (Police) अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेबाबत लष्कराकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये लष्कराचे वाहन जळताना दिसत आहे. शेजारुन जाणारे लोक आग विझवण्यास मदत करताना दिसले.

येथे व्हिडिओ पाहा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT