Indian Army helicopter crash in Jammu-Kashmir Udhampur district at Shivgarhdhar
Indian Army helicopter crash in Jammu-Kashmir Udhampur district at Shivgarhdhar Dainik Gomantak
देश

जम्मू -काश्मीरात लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश, 2 जण जखमी

दैनिक गोमन्तक

जम्मू -काश्मीरच्या (Jammu-Kashmir) उधमपूर (Udhampur) जिल्ह्यातील शिवगड धार (Shivgarhdhar)येथून लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. पोलीस आणि लष्कराने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराचे पथक शिवगड धारच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर कोसळण्याच्या या घटनेत दोन वैमानिक जखमी झाले आहेत.(Indian Army helicopter crash in Jammu-Kashmir Udhampur district at Shivgarhdhar)

पोलिसांनी सांगितले की परिसरात दाट धुके आहे, त्यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले की क्रॅश लँडिंग करावी हे आत्ताच सांगता येणार नाही. जम्मू -काश्मीर पोलिसांनी माहिती दिली की, उधमपूरच्या पाटनीटॉप परिसराजवळ स्थानिक लोकांनी हेलिकॉप्टर खाली पडल्याची माहिती दिली होती. आम्ही त्या भागात टीम पाठवली आहे.

जिल्ह्यातील शिवगड धार परिसरात सकाळी 10.30 ते 10.45 दरम्यान ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांनी सांगितले की स्थानिक लोकांनी हेलिकॉप्टरमधून पायलटला बाहेर काढले. हे हेलिकॉप्टर लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सचे आहे. उत्तर कमांडच्या संरक्षण प्रवक्त्याने अपघाताची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अपघाताशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे आणि लष्कर या संदर्भात एक निवेदन जारी करेल.

एका उच्च स्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांचे एक पथक दुर्गम भागासाठी रवाना झाले आहे आणि त्यांना तेथे पोहोचण्यास थोडा वेळ लागेल. यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी रणजीत सागर धरणात भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले होते. हा अपघात सकाळी 10.20 च्या सुमारास झाला. लष्कराच्या एव्हिएशन स्क्वाड्रनचे ध्रुव हेलिकॉप्टरने ममून कॅन्टमधून उड्डाण केले होते. अपघातावेळी हेलिकॉप्टर रणजित सागर धरणाजवळ गस्त घालत होते. टेकडीवर आदळल्यामुळे तो थेट धरणात पडला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT