India vs Pakistan Dainik Gomantak
देश

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

India vs Pakistan Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मध्ये रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला.

Sameer Amunekar

Asia Cup 2025 India vs Pakistan

आशिया कप २०२५ मध्ये रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्ताननं भारताला १२८ धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं दमदार फलंदाजीच्या जोरावर हे आव्हान सहज पूर्ण केलं. आशिया कपमधील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. पाकिस्तान संघ ९ विकेट्स गमावत केवळ १२७ धावाच करू शकला. पाकिस्तानची पहिली विकेट पहिल्याच चेंडूवर पडली आणि तिथून विकेट्स पडण्याचा क्रम थांबला नाही.

पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावसंख्या सलामीवीर साहिबजादा फरहाननं केली, ज्याला कुलदीप यादवने ४४ चेंडूत ४० धावा काढल्यानंतर बाद केलं. संघाचे २ फलंदाज गोल्डन डकवर बाद झाले. असं वाटतं होत की, पाकिस्तानसाठी १०० धावांचा टप्पा ओलांडणं कठीण होतं.

परंतु त्यानंतर त्यांचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने १६ चेंडूत ३३ धावांची छोटी खेळी केली. त्यांच्या खेळीमुळं संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत केली.

भारताची फलंदाजी

भारतीय संघानं फलंदाजीची चांगली सुरूवात केली. सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानं जलद धावा काढत संघाला गती दिली. मात्र, शुभमनला मोठी खेळी जमली नाही. तो पाकिस्तानी गोलंदाज सैम अयुबच्या अचूक चेंडूवर केवळ १० धावा करून बाद झाला. दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करत जबाबदारी उचलली. त्याने आकर्षक फटके खेळले, पण ३१ धावा करून तोही सैम अयुबच्याच गोलंदाजीत माघारी परतला.

सलामीवीरांच्या बाद झाल्यानंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीनं भारतीय डाव सावरला. दोघांनी संयमी पण प्रभावी फलंदाजी करत संघाच्या धावफलकाला गती दिली. त्यांच्या खेळीमुळे भारतीय संघाला मध्यफळीत मजबूत पकड मिळाली. अखेर सूर्यानं षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. त्याने ३७ चेंडूत ४७ धावा केल्या, तर शिवम दुबेनं ७ चेंडूत १० धावा केल्या. अखेरीस भारतानं हा सामना ७ विकेट्सनं खिशात घातला.

दोन्ही संघ

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT