Union Ministry of Sport Dainik Gomantak
देश

Union Ministry of Sports: कुस्ती महासंघ अखेर ‘चितपट’

गोमन्तक डिजिटल टीम

Union Ministry of Sports: तीन दिवसांपूर्वीच निवडून आलेल्या भारतीय कुस्ती संघटनेच्या नव्या कार्यकारिणीला दणका बसला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कार्यकारिणीला निलंबनाची ‘शिक्षा’ सुनावली आहे.

तसेच भारतीय कुस्ती संघटनेचे कामकाज सांभाळण्यासाठी हंगामी समिती स्थापन करण्याचे आदेशही भारतीय ऑलिंपिक संघटनेला दिले आहेत. भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विश्वासातील संजय सिंह यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

मात्र, या कार्यकारिणीला सरकारने ‘चितपट’ केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पत्रक जारी करून निर्णयाची माहिती दिली. ‘‘भारतीय कुस्ती संघटनेची नवी कार्यकारिणी निवडून आली.

या कार्यकारिणीने तत्काळ १५ व २० वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन गोंडा येथे करण्याचा निर्णय घेतला. कुस्तीपटूंना पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही.

खेळाडूंच्या हिताचा निर्णय

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या साक्षी मलिक या भारताच्या दिग्गज कुस्तीपटूने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे कौतुक केले व हा निर्णय खेळाडूंच्या हिताचा असल्याचे नमूद केले. ती म्हणाली, ‘‘नवी कार्यकारिणी निलंबित व्हावी असे वाटत होते. कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी महिला असावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT