1971 War India Pakistan War  Dainik Gomantak
देश

Indian Navy:...आणि कराची बंदर सात दिवस जळत होते; ज्यानं पाकिस्तानचे कंबरडे मोडले असे 'ऑपरेशन ट्रायडन्ट'

भारत हा जगातील एकमेव देश आहे जो दुसऱ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला होता.

Pramod Yadav

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं सर्वात मोठं युद्ध म्हणजे 1971 चे युद्ध, (India-Pakistan War 1971) या युद्धाने एका नव्या देशाला जन्म दिला, ज्याला आज आपण 'बांग्लादेश' म्हणून ओळखतो. या युद्धात भारतीय लष्काराचे कौशल्य पणाले लागले होते. भारतीय लष्काराच्या तिन्ही तुकड्यांनी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केली. यामध्ये भारतीय नौदलाच्या 'ऑपरेशन ट्रायडन्ट'मुळे (Operation Trident 1971) पाकिस्तानचे कंबरडे मोडले. नौदलाच्या ऑपरेशनमध्ये कराची बंदर तर उद्धवस्त झालेच पण, यानंतर जवळपास सात दिवस कराची बंदर जळत होते.

भारत हा जगातील एकमेव देश आहे जो दुसऱ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला होता.

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान वाद

स्वातंत्र्यानंतर 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन प्रांत निर्माण झाले. पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) पश्चिम पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होता. पाकिस्तानी सैन्याच्या अमानुष अत्याचाराला कंटाळून तेथील नागरिकांनी बंड पुकारले. पाकिस्तानचे अत्याचार वाढले तेव्हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांना पाकिस्तानविरुद्ध आक्रमण करण्याचे आदेश दिले. शेख मुजिबूर रहमान बांग्लादेशच्या क्रांती लढ्याचे नेतृत्व करत होते.

बांगलादेशात 3,00,000 नागरिक मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. बलात्कार, अत्याचार, हत्या (Pakistan Genocide) यामुळे 80 लाख ते एक कोटी लोकांनी भारतात आश्रय घेण्यासाठी बांगलादेश सोडला.

Karachi Port

ॲडमिरल नंदा आणि पंतप्रधान इंदिरा गांधी भेट

भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) पाक लष्कराविरुद्ध युद्ध सुरू केले होते. ऑपरेशन ट्रायडन्ट हे पहिले मिशन होते, या युद्धात प्रथमच जहाजविरोधी क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. तत्कालीन नौदल प्रमुख ॲडमिरल एसएम नंदा यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ट्रायडन्ट सुरू करण्यात आले होते. अ‍ॅडमिरल नंदा यांनी स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे जाऊन या मिशनची माहिती दिली होती.

ॲडमिरल नंदा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना विचारले होते की, "मॅडम, जर नौदलाने आपल्या पूर्ण क्षमतेने कराचीवर हल्ला केला, तर कोणताही राजकीय वाद तर होणार नाही ना?"

त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, "अ‍ॅडमिरल,इफ देयर इस वार, देयर इस वार. जर प्रत्येकजण आपल्या मर्यादेत राहिला तर युद्ध होणारच नाही." यावर ॲडमिरल नंदा यांनी मला माझे उत्तर मिळाले असे म्हणाले.

ऑपरेशन ट्रायडन्ट

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी भेट झाल्यानंतर एक सीलबंद लिफाफा अॅडमिरल नंदा यांना मिळाला. नंदा यांना ऑपरेशन ट्रायडन्टसाठी परवानगी मिळाली होती. त्यानंतर 4 डिसेंबर 1971 रोजी, 25 व्या स्क्वॉड्रन कमांडर बब्रू भान यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तान नौदलाच्या मुख्यालयावर पहिला हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा पुरवठा करणाऱ्या जहाजांसह इतर अनेक जहाजे उद्ध्वस्त झाली.

स्क्वॉड्रन कमांडर बब्रू भान यादव निपत, निर्घाट आणि वीर क्षेपणास्त्र नौकांसह पुढे कूच केली. या हल्ल्यात रशियाच्या ओसा मिसाईल बोटीचाही वापर करण्यात आला.

Karachi Port

आजपर्यंत यापेक्षा चांगली दिवाळी आम्ही पाहिली नाही.

भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात प्रथम पीएनएस खैबरला लक्ष्य करण्यात आले, नंतर पीएनएस चॅलेंजर आणि नंतर पीएनएस मुहाफिज उद्ध्वस्त केले. या हल्ल्यामुळे कराचीच्या तेल डेपोमध्ये आग लागली. या आगीत तब्बल सात दिवस कराची बंदर जळत होते. असे सांगितले जाते की ही आग 60 कि.मी अंतरावरून देखील दिसत होती. तसेच, आशियातील सर्वात मोठा हा स्फोट होता.

ऑपरेशन संपल्यानंतर भारतीय नौदल अधिकारी विजय जेरथ यांनी 'फॉर पिजन हॅप्पी इन द नेस्ट, रिजॉईंनिंग'' असा एक संदेश पाठवला. त्यावर त्यांना 'आम्ही आजवर यापेक्षा चांगली दिवाळी पाहिली नाही.' असे उत्तर त्यांना मिळाले.

93,000 सैनिकांचे आत्मसमर्पण आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 या काळात 13 दिवस युद्ध चालले. अखेर भारतीय लष्करापुढे पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले. पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी आत्मसमर्पण केले. आणि बांगलादेशातील 7.5 कोटी लोक स्वतंत्र (Bangladesh Libration) झाले. या युद्धात भारताचे 3,000 सैनिक शहीद झाले. तर, पाकिस्तानचे 8000 जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानी लष्कराने 1971 च्या युद्धात केलेले आत्मसमर्पण जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे लष्करी आत्मसमर्पण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT