India Ebola Advisory 
देश

India Ebola Advisory: कोरोनानंतर आता इबोलाचं संकट? भारत सरकारकडून नवी अ‍ॅडव्हायझरी जारी; नागरिकांना खबरदारीचं आवाहन

Health Ministry Ebola Guidelines: इबोलाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मंगळवारी (2 जून) एक नवीन अ‍ॅडवायझरी जारी केली.

Manish Jadhav

Health Ministry Ebola Guidelines: इबोलाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मंगळवारी (2 जून) एक नवीन अ‍ॅडवायझरी जारी केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या भारतात इबोलाचा एकही संसर्ग झालेला रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ज्या नागरिकांनी अलीकडच्या काळात इबोला प्रभावित देशांमधून प्रवास केला किंवा तिथून ट्रान्झिट केले, त्यांनी स्वतःला 'आयसोलेट' करावे आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन सरकारने केले.

निवेदनानुसार, जर एखाद्या व्यक्तीने गेल्या 21 दिवसांत इबोला प्रभावित देशाचा प्रवास केला असेल आणि त्याला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या, जुलाब किंवा शरीरातून अंतर्गत रक्तस्त्राव यांसारखी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी त्वरित स्वतःला आयसोलेट करावे. यासोबतच सरकारने '1075' हा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला असून, कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. योग्य वेळी लक्षणे सांगून उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो आणि रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते, असे मंत्रालयाने म्हटले. यापूर्वीच सरकारने डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान (Sudan) या देशांचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला.

भारतामध्येही (India) गेल्या काही आठवड्यांपासून इबोलाबाबत चिंतेचे वातावरण होते, परंतु नुकतीच गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी या संदर्भातील भीती दूर केली. काँगो देशातून आलेल्या एका संशयित प्रवाशाची इबोला चाचणी करण्यात आली, ज्याचा रिपोर्ट पूर्णपणे 'नेगेटिव्ह' आला. आरोग्यमंत्र्यांनी जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरुन न जाण्याचे आवाहन केले. आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीवरच नागरिकांनी विसंबून राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या महिन्यात इबोला उद्रेकाला 'आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केले. प्रभावित देशांमध्ये या आजारामुळे आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1077 हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओने स्पष्ट केले की, इबोला अद्याप साथीच्या रोगाच्या पातळीवर पोहोचलेला नाही, तरीही काँगोच्या सीमावर्ती देशांना मोठा धोका आहे. दरम्यान, 'ब्लूमबर्ग'च्या ताज्या रिपोर्टनुसार, काँगोमधील सर्वात जास्त प्रभावित पूर्व प्रांतातील मुख्य विमानतळ पुन्हा सुरु करण्यात आले, कारण तिथे इबोलाचा संसर्ग मंदावल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत. मात्र, तरीही संशयित रुग्णांचा शोध घेण्याचे आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचा तपास करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT