India Census 2023 Dainik Gomantak
देश

India Census: लोकसभा निवडणुकीपूर्वी जनगणना होणार?

नागरिकांना विचारण्यात येणारे प्रश्नही तयार

Akshay Nirmale

India Census 2023: देशात कोरोना महामारीमुळे दर 10 वर्षांनी होणारी जनगणना झाली नाही. तथापि, आता ही जनगणना लोकसभा निवडणुकीपूर्वी होऊ शकते. कोविड 19 महामारीमुळे देशातील जनगणना पुढे ढकलण्यात आली होती.

जनगणनेमध्ये किमान 31 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्यात स्मार्टफोन, इंटरनेट, लॅपटॉप, संगणक, कार आणि दुचाकी वाहने तसेच मुख्य अन्न धान्य कोणते वापरले जाते, अशा प्रश्नांचा समावेश असल्याचे समजते.

जनगणना करताना लोकांकडून विचारण्यात येणारे प्रश्न निश्चित करण्यात आल्याची माहिती जनगणना आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

या प्रश्नांमध्ये कुटुंबाकडे टेलिफोन लाइन, इंटरनेट कनेक्शन, मोबाइल किंवा स्मार्टफोन, सायकल, स्कूटर आणि मोटारसायकल आहे का, कुटुंबाकडे कार, जीप किंवा व्हॅन आहे का, इत्यादींचा समावेश असेल.

जनगणनेदरम्यान भारतीय नागरिकांना पाणी आणि वीज पुरवठ्याच्या मुख्य स्त्रोताबद्दल देखील विचारले जाऊ शकते. शौचालय आणि त्याचे प्रकार, सांडपाण्याचा निचरा, आंघोळीची व्यवस्था, स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन देखील विचारले जाऊ शकते.

त्याचबरोबर घरबसल्या करमणुकीच्या साधनांचीही माहिती मिळू शकते. इतकेच नाही तर लोकांना त्यांच्या घरात कोणत्या वस्तू वापरल्या जातात, घरात किती लोक राहतात, प्रमुख स्त्री आहे की पुरुष, घरात किती विवाहित जोडपे आहेत इत्यादी प्रश्न विचारले जाऊ शकतात.

यावेळची जनगणना गेल्या 70 वर्षांतील सर्वात अचूक असेल. अचूक जनगणनेअभावी अचूक अर्थसंकल्प तयार होऊ शकला नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले होते.

2019 मध्ये, केंद्र सरकारने 2021 च्या जनगणनेची तयारी सुरू केली आणि योजनेअंतर्गत 8,754 कोटी रुपये वितरित केले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

Elton D Costa: "विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडं!" आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी भक्तीभावाने घेतले दर्शन

Goa Agriculture: "सुपीक शेतजमिनींवर एकही प्रकल्प नकोच!" दुधाला तातडीने हमीभाव वाढ द्या ,भारतीय किसान संघाचा सरकारला थेट इशारा

Consumer court: अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना न्यायालयाचा मोठा झटका! कार्यक्रमाला दांडी मारणे पडले महाग; ३ लाखांच्या दंडासह नुकसान भरपाईचा आदेश

Goa health Camp: 14 महिलांमध्ये 'बेनाइन' स्तनगाठी; 163 नागरिकांची तपासणी, धारबांदोडा येथे कर्करोग निदान शिबिर

SCROLL FOR NEXT