Recruitment 

 

Dainik Gomantak 

देश

Income Tax Department Recruitment: खेळाडूंना आयकर विभागात नोकरीची संधी

दोन कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांवर भरती केली जाईल.

दैनिक गोमन्तक

केरळच्या मुख्य आयकर आयुक्तांनी (Principal Chief Commissioner of Income Tax) खेळाडूंना कर सहाय्यक व मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज करण्यास आमंत्रित केले आहे. https://incometaxindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पुढील दोन कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांवर आयकर विभागात (Income Tax Department) भरती केली जाईल.

एकूण रिक्त पदे किती ?
कर सहाय्यक - 05
मल्टी-टास्किंग स्टाफ - 02

पात्रता?
कर सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापीठातून (University) पदवी धारक असणे आवश्यक आहे. याच बरोबर डेटा एंट्रीचा वेग 8,000 की डिप्रेशन प्रति तास असावा. मल्टी-टास्किंग स्टाफ पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा?
कर सहाय्यक पदासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावा. मल्टी-टास्किंग स्टाफसाठीचा उमेदवार 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावा.

अर्ज कसा करावा?
रीतसर भरलेला अर्ज एका बंद कव्हरमध्ये सादर करणे आवश्यक आहे. पाकीटावर "आयकर विभाग 2021-22 मधील क्रीडा कोट्यातील भरतीसाठी अर्ज" असे नुमद करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
आयकर उपायुक्त (मुख्यालय)(प्रशासन), प्रधान मुख्य आयकर आयुक्त, केरळ, C.R. बिल्डिंग, I.S. प्रेस रोड, कोची 682018.

शेवटची तारीख?
ईशान्येकडील राज्ये, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने किंवा वैयक्तिकरित्या पाठवणे आवश्यक आहे.

अधिकृत अधिसूचना तपासा
अटी व शर्ती आणि उमेदवारांना दिलेल्या सूचनांसह अर्जाचा फॉर्म प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवरूनही डाउनलोड केला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT