Married Woman Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: दिरासोबत 'इश्क', तीन मुलांच्या आईने घेतला अंधाराचा फायदा; नवऱ्यासोबत विश्वासघात...!

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका विवाहित महिलेने अंधाराचा फायदा घेत असे काही केले की, संपूर्ण गावात चर्चा होत आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका विवाहित महिलेने अंधाराचा फायदा घेत असे काही केले की, संपूर्ण गावात चर्चा होत आहे. ही महिला आपल्या दिराच्या प्रेमात होती. दिराचेही आपल्या भावाच्या पत्नीवर जिवापाड प्रेम होते.

दोघांना प्रत्येकी तीन मुले आहेत. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की, महिलेच्या नवऱ्यालाही याचा सुगावा लागला नाही. आता या महिलेला आपल्या नवऱ्यासोबत राहायचे नाही.

दरम्यान, या महिलेने (Woman) आपल्या दिरासोबत पळून जाण्याचा बेत आखला आणि एका रात्री दोघे पळूनही गेले. त्यानंतर 10 दिवसांनी ते परतले आणि थेट कोतवाली गाठले.

माहिती मिळताच तिचे कुटुंबीय आणि नवराही तिथे पोहोचला, मात्र प्रेमात वेडी झालेली ही महिला आपल्या दिरासोबत जाण्यावर ठाम राहिली. अनेक तासांच्या समजुतीनंतरही तिने तिचाच हट्ट पूर्ण केला आणि ती आपल्या दिरासोबत निघून गेली.

हे प्रकरण कोतवाली भागातील एका गावाशी संबंधित आहे. जिथे गावातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीचे तिच्याच दिरासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनाही प्रत्येकी 3 मुले आहेत. दोघेही दहा दिवसांपूर्वी कोणाला न सांगता घरातून पळून गेले.

महिलेच्या नवऱ्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी दोघांचा खूप शोध घेतला, पण ते कुठेच सापडले नाहीत. शनिवारी दुपारी अचानक महिला आणि दीर थेट कोतवालीत पोहोचले.

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच महिलेचा नवरा, मुले आणि कुटुंबीयही कोतवालीत पोहोचले. जिथे तिच्या नवऱ्याने आपल्याशी असलेल्या संबंधाचा हवाला देत तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण दिराच्या प्रेमात ती इतकी वेडी झाली की तिने आपल्या मुलांचीही फिकीर केली नाही.

आता, या महिलेला दिरासोबतच राहायचे आहे. यादरम्यान पोलिसांनीही (Police) तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. महिलेचा नवरा मीरगंज येथील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. दुसरीकडे, सायंकाळी उशिरा पोलिसांनी तिला स्वत:च्या इच्छेनुसार दिरासोबत पाठवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT