Vaccination Dainik Gomantak
देश

बूस्टर डोस घेतलेल्या 70 टक्के लोकांना तिसऱ्या लाटेत कोरोना झाला नाही: अहवाल

भारतात (India) महामारीच्या तिसऱ्या लाटेत कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या 70 टक्के लोकांना कोरोनाची लागण झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

भारतात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या 70 टक्के लोकांना कोरोनाची लागण झालेली नाही. सुमारे सहा हजार लोकांचा समावेश असलेल्या एका अभ्यासातून हे सांगण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नॅशनल टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे नमूद केले आहे की, कोरोना लस घेतलेल्या परंतु बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांपैकी 45 टक्के लोकांना तिसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली नव्हती. सर्वेक्षणात 5,971 लोकांचा समावेश करण्यात आला ज्यांचे लसीकरण करण्यात आले होते, त्यापैकी 24 टक्के 40 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आणि 50 टक्के 40-59 वयोगटातील होते. अभ्यासात सहभागी लोकांपैकी 45 टक्के महिला होत्या, तर 53 टक्के आरोग्य कर्मचारी होते. (In India 70 per cent of people who took booster doses did not get covid in the third wave report)

दरम्यान, अभ्यासात सामील असलेल्या 5,971 लोकांपैकी 2,383 जणांनी बूस्टर डोस घेतला होता. त्यापैकी 30 टक्के लोकांना तिसऱ्या लाटेत कोरोना झाला होता. त्यानंतर संशोधकांनी असा निष्कर्षही काढला की, दुसऱ्या डोसनंतर तिसर्‍या लाटेमध्ये संसर्गाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय, अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, 'सहा महिन्यांच्या अंतरापूर्वी तिसरा डोस दिल्याने संक्रमण दरात कोणताही फरक पडला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT