Delhi Legislative Assembly Dainik Gomantak
देश

दिल्लीतील आमदार लवकरच होणार 'मालामाल'; जाणून घ्या किती मिळणार पगार?

केंद्र सरकारने दिल्ली विधानसभेच्या (Delhi Legislative Assembly) ठरावाला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये 11 वर्षांनंतर आमदारांचे वेतन वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने दिल्ली विधानसभेच्या ठरावाला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये 11 वर्षांनंतर आमदारांचे वेतन वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती. याआधी 2015 साली दिल्ली (Delhi) सरकारने केंद्राकडे पगारवाढीचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु तो मंजूर झाला नव्हता. केंद्राच्या सूचनेवरुन पुन्हा पाठवलेल्या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आली आहे. (In Delhi the salaries of MLAs will be increased soon the central government approved the resolution of the Delhi Assembly)

दरम्यान, दिल्लीतील आमदारांना (MLAs) आता मूळ वेतन म्हणून 12 हजारांऐवजी 20 हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. आमदारांच्या पगाराशिवाय इतर भत्तेही वाढले आहेत. पगार आणि सर्व भत्त्यांसह, आता दिल्लीतील आमदारांना दरमहा 90 हजार रुपये मिळणार आहेत, जे आतापर्यंत 54 हजार रुपये होते.

तसेच, दिल्ली विधानसभेच्या पुढील अधिवेशनात (Convention) वेतनवाढीचे विधेयक आणले जाईल. यापूर्वी 2011 मध्ये दिल्लीच्या आमदारांच्या पगारात वाढ करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT