Goat

 

Dainik Gomantak 

देश

OMG! मानवी चेहरा घेऊन जन्माला आलं शेळीचं पिल्लू

आसामच्या (Assam) कचार जिल्ह्यात एका शेळीने मानवासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला, ज्यामुळे स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले.

दैनिक गोमन्तक

आसामच्या कचार जिल्ह्यात एका शेळीने मानवासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला, ज्यामुळे स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले. शेळीचे पिल्लू मृत जन्माला आले परंतु त्याचे मानवी संततीसारखे साम्य अनेकांना आश्चर्यचकित केले. आसाममधील (Assam) धोलाई विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गंगापूर गावात ही घटना घडली.

दरम्यान, शेळीच्या बाळामध्ये मानवासारखी अनेक वैशिष्ट्ये होती. त्याचे डोळे, नाक आणि तोंड माणसासारखे दिसत होते. त्याचे कान बकरीसारखे दिसत होते. विशेष म्हणजे हे पिल्लू दोन अंगांनी जन्माला आले. अशाप्रकारे मानवासारखे दिसणारे पिल्लू शेळीने जन्माला घातले असल्याची बातमी पंचक्रोशित पसरताच या पिल्लाला पाहण्यासाठी लोक गर्दी करु लागले.

शिवाय, या अनोख्या बकरीचा फोटो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे पिल्लू हुबेहुब मानवासारखे दिसते होते. त्याचबरोबर गावकऱ्यांमध्ये आणखी काही चर्चा सुरु आहे की, बकरीच्या पोटात कुठल्यातरी पूर्वजाने जन्म घेतला आहे. स्थानिकांनी प्रथेनुसार शेळीच्या पिल्लाला दफन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT