Crime News
Crime News Dainik Gomantak
देश

IIT हैदराबादमध्ये विद्यार्थीनीची आत्महत्या, 21 दिवसांत दुसरी घटना

Manish Jadhav

Telangana Crime: तेलंगणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयआयटीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने आपले जीवन संपवले. वसतिगृहाच्या खोलीत तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला.

या विद्यार्थिनीने 26 जुलै रोजीच सिव्हिल इंजिनीअरिंगच्या एमटेकच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. खोलीतून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या मृत्यूचे कारण उघड केले आहे.

आयआयटीमध्ये तीन आठवड्यांतील ही दुसरी, तर वर्षभरातील चौथी आत्महत्या आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

दरम्यान, हे प्रकरण संगारेड्डी जिल्ह्यातील कांडी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद (IIT-H) चे आहे. येथील कॅम्पसमधील वसतिगृहाच्या खोलीत 21 वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थिनीचा मृतदेह सोमवारी रात्री लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

ओडिशातील (Odisha) ममिता नायक असे मृत मुलीचे नाव असून, तिने 26 जुलै रोजीच सिव्हिल इंजिनीअरिंगच्या एमटेकच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता.

दुसरीकडे, संगारेड्डी (ग्रामीण) पोलीस उपनिरीक्षक एम राजेश नाईक यांनी सांगितले की, वसतिगृहाच्या खोलीत राहणाऱ्या ममिताला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थीनींनी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले.

त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. एसआयने सांगितले की, "आम्ही तिच्या खोलीतून एक सुसाइड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये तिने ओडिया भाषेत दोन ओळींमध्ये आपली आपबिती सांगितली होती. तिने लिहिले होते की, तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही."

तीन आठवड्यांत दुसरी घटना

तसेच, ही विद्यार्थिनी मानसिक तणावात असल्याचे नाईक यांनी सांगितले. याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.

नाईक यांनी पुढे सांगितले की, “आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगारेड्डी सरकारी रुग्णालयात पाठवला असून तिच्या पालकांना कळवले आहे.”

पोलिसांच्या (Polie) मते, तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आयआयटी-एच मधील विद्यार्थ्याची ही दुसरी आत्महत्या असून गेल्या एका वर्षातील ही चौथी घटना आहे.

याआधी, 17 जुलै रोजी डी कार्तिक (21) हा बीटेकच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कॅम्पसमधून बेपत्ता झाला होता. तीन दिवसांनंतर त्याचा मृतदेह विशाखापट्टणम येथे किनाऱ्यावर सापडला होता. 25 जुलै रोजी त्याच्या पालकांनी त्याची ओळख पटवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2022 रोजी बी राहुल या एमटेकच्या विद्यार्थ्याने देखील IIT-H कॅम्पसमधील वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती.

दुसरीकडे, एका वरिष्ठ आयआयटी-एच कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, संस्थेकडे मानसशास्त्रातील तज्ज्ञ असलेले समुपदेशन केंद्र आहे. जे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबाव कमी करण्यासाठी नियमितपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. असे असले तरी अशा घटना वेळोवेळी घडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT