Chandrayaan-3 Landing Date
Chandrayaan-3 Landing Date Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3 Landing Date: चांद्रयान-३ चे लँडिंग लांबणार! इस्रो काय म्हणाले?

Ashutosh Masgaunde

If lander of Chandrayaan-3 does not find a suitable place for landing, landing may be postponed: 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान चांद्रयान-3 च्या लँडरला लँडिंगसाठी योग्य जागा मिळाली नाही, तर लँडिंग पुढे ढकलले जाऊ शकते. यासाठी इस्त्रोने बॅकअप योजना आखली आहे.

इस्रोचे गुजरातमधील अहमदाबाद येथे केंद्र आहे. त्याचे नाव स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) आहे. त्याचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले की 23 ऑगस्ट 2023 रोजी लँडिंगच्या दोन तास आधी इस्रोचे मुख्य शास्त्रज्ञ लँडिंग करायचे की नाही याचा निर्णय घेतील.

यामध्ये आम्हाला उतरण्यासाठी योग्य जागा मिळाली की नाही हे पाहणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

लँडरची परिस्थिती कशी आहे? तसेच चंद्राच्या वातावरणाची आणि पृष्ठभागाची स्थिती काय आहे? ते लँडिंगसाठी योग्य आहे का? या सर्वाची लॅंडिंग पूर्वी खात्री केली जाईल.

यावेळी काही त्रुटी सापडल्या किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास 27 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चे लँडिंग करण्यात येईल.

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरवण्यासाठी LHDAC कॅमेरा तयार करण्यात आला आहे. याची निर्मिती स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथे करण्यात आली आहे.

यासह, लँडिंगच्या वेळी आणखी काही पेलोड्स मदत करतील, त्यामध्ये लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC), लेझर अल्टिमीटर (LASA), लेझर डॉप्लर व्हेलॉसिटीमीटर (LDV) आणि लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (LHVC) यांचा समावेश असून, चे एकत्र काम करतील. जेणेकरून लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवता येईल.

विक्रम लँडर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, तेव्हा त्याचा वेग सुमारे 2 मीटर प्रति सेकंद असेल. परंतु क्षैतिज गती प्रति सेकंद 0.5 मीटर असेल. विक्रम लँडर 12 अंश वळण असलेल्या उतारावर उतरू शकतो.

ही सर्व उपकरणे विक्रम लँडरला हा वेग, दिशा आणि सपाट जमीन शोधण्यात मदत करतील. ही सर्व उपकरणे लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 500 मीटर अंतरावरून कार्यान्वित होतील.

चांद्रयान-३ च्या लँडरशी संपर्क करण्यासाठी इस्रोने दोन माध्यमांचा अवलंब केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे यावेळी चांद्रयान-३ मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले नाही. त्याच्या जागी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवण्यात आले आहे.

ज्याचा उद्देश फक्त चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ आणण्याचा होता. याशिवाय, लँडर आणि बंगळुरूमध्ये स्थित इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) यांच्यात संपर्क स्थापित केला जाणार होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT