Delhi Dainik Gomantak
देश

कुत्र्यासाठी खेळाडूंना ट्रॅकवरुन हाकलणाऱ्या IAS अधिकाऱ्याची बदली

स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवण्याची मागणी करणाऱ्या आयएएस (IAS) अधिकाऱ्यावर केंद्र सरकारने कारवाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवण्याची मागणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यावर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. संजीव खिरवार यांची लडाख येथे बदली करण्यात आली आहे. संजीव खिरवार यांच्या पत्नी IAS रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली.

दरम्यान, त्यागराज स्टेडियमच्या ट्रॅकवर IAS अधिकाऱ्याने कुत्र्याची सैर केल्यामुळे खेळाडूंना सराव करण्यापासून थांबवण्यात आले. खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, आधी आम्ही 8 वाजेपर्यंत सराव करायचो. परंतु नंतर सुरक्षा रक्षकांनी 7 वाजता खेळाडूंना ट्रॅकवरुन हटवण्यास सुरुवात केली.

तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शहरातील सर्व सरकारी क्रीडा केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी गुरुवारी ही माहिती दिली. एका आयएएस अधिकाऱ्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर ही सूचना समोर आली आहे.

दुसरीकडे, IAS संजीव खिरवार यांनी संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. ''माझ्यामुळे सराव बंद झाल्याची बाब निराधार आहे. मी क्वचितच कुत्र्यासोबत ट्रॅकवर जातो. जेव्हा खेळाडू नसतात तेव्हाच मी जातो. कधीही कोणत्याही खेळाडूला स्टेडियम (Stadium) सोडण्यास सांगितले नाही. मी सुद्धा कुत्र्याला तेव्हाच ट्रॅकवर सोडतो, जेव्हा तिथे कोणी नसते. जर ते आक्षेपार्ह असेल तर मी ते बंद करेन,'' असे खिरवार यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT