Air Force Dainik Gomantak
देश

IAF Agniveer Recruitment 2022: अग्निवीर भरतीसाठी 6 दिवसांत 2 लाखांहून अधिक अर्ज

अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यापासून सहा दिवसांत दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

IAF Agniveer Recruitment 2022: भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यापासून सहा दिवसांत दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. 24 जूनपासून नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविवारपर्यंत 56,960 अर्ज आले असून सोमवारपर्यंत 94,281 अर्ज प्राप्त झाले आहेत. 14 जून रोजी ही योजना जाहीर करण्यात आली असून एका आठवड्यानंतर या योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये निदर्शने झाली. (IAF Agniveer Recruitment 2022 Under Agnipath Scheme Indian Air Force Gets Over 2 Lakh Applications In 6 Days)

दरम्यान, वायुसेनेने ट्विटमध्ये म्हटले की, “आतापर्यंत 2,01,000+ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 5 जुलै रोजी नोंदणी बंद होईल.''

तसेच, अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय लष्कर (Indian Army), नौदल आणि हवाई दलात 4 वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जात आहे. वायुसेनेच्या (Air Force) अग्निवीरांना 'अग्निवीरवायू' असे नाव देण्यात आले आहे. 4 वर्षांनंतर 75 टक्के सैनिकांना घरी पाठवले जाईल. उर्वरित 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरुपी जवान म्हणून नियुक्त केले जाईल. हवाई दलात अग्निवीरवायूच्या 3500 जागा रिक्त आहेत.

वायुसेना अग्निवीर भरतीसाठी पात्रता

शैक्षणिक पात्रता

A. सायन्स विषयांसाठी

- अर्जदार गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेला असावा. इंग्रजीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.

एकतर

50% गुणांसह तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा धारक

एकतर

भौतिकशास्त्र आणि गणित या दोन गैर-व्यावसायिक विषयांसह एकूण किमान 50 टक्के गुणांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम.

B. सायन्स विषयांव्यतिरिक्त इतर विषयांसाठी

12वी त कोणत्याही शाखेत किमान 50% गुणांसह उत्तीर्ण. इंग्रजीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे वय

उमेदवाराचे वय 17.5 वर्षांपेक्षा जास्त आणि 23 वर्षांपेक्षा कमी असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान झालेला असावा. उमेदवाराने निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार केले तर नावनोंदणीच्या वेळी कमाल वयोमर्यादा 23 वर्षे असेल.

अर्ज फी - रु.250

डेबिट कार्ड/क्रेडिट किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे फी भरली जाऊ शकते.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड या टप्प्यात केली जाईल-:

  • - ऑनलाइन चाचणी.

  • - शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT)

  • - वैद्यकीय चाचणी.

  • - अंतरिम निवड यादी - 1 डिसेंबर 2022

  • नावनोंदणी - 11 डिसेंबर 2022

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT