Money  Dainik Gomantak
देश

13 वर्षीय मुलावर खंडणीचा गुन्हा

आपले शारीरिक नुकसान होऊ शकते या भीतीने पीडितेने काही दिवसांपूर्वी कुटुंबातील तिजोरीतील पैसे (Money) चोरले

दैनिक गोमन्तक

हैदराबाद: एखाद्यावर विश्वास ठेवावा की नको असा प्रश्न हैदराबाद (Hyderabad) येथील एका घटनेवरून पडला आहे. बंजारा हिल्समधील एका वर्गमित्राकडून मुलाने धमकावून एक लाख रुपये घेतले. पोलिसांच्या (police) माहिती नुसार, मुलाने त्याच्याच वयाच्या पीडितेला पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मुलाने दिला.

यानंतर, पीडित मुलीच्या वडिलांना त्यांच्या घरातील तिजोरीमध्ये पैसे नसल्याचे दिसल्यानंतर ही बाब त्यांनी उघडकीस आणली. त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला पैसे कुठे गेले याची विचारणा केली. त्यानंतर मुलाने त्यांना सर्व प्रकार सांगितला.

ही दोन्ही मुले एकाच शाळेतील सातवीचे विद्यार्थी आहेत. त्रास सुरू झाला जेव्हा पीडितेने त्याच्या मित्राला सांगितले की त्याच्या घरी तिजोरीत बरेच पैसे ठेवले आहेत. तेव्हापासून 13 वर्षीय तरुणाने पैशांसाठी पीडितेचा छळ करून त्याच्याकडील पुस्तके व इतर साहित्य (Books and materials) हिसकावून घेतले आणि पैसे न दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. आपले शारीरिक नुकसान होऊ शकते या भीतीने पीडितेने काही दिवसांपूर्वी कुटुंबातील तिजोरीतील पैसे चोरले आणि आपल्या वर्गमित्राला दिले. आपला मुलगा खंडणीचा बळी असल्याचे पीडितेच्या वडिलांना तीन दिवसांपूर्वी समजले. पीडितेच्या वडिलांनी त्यानंतर लगेच पोलिसात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.

कसा घडला का प्रकार:

त्रास सुरू झाल्यानंतर जेव्हा पीडितेने आपल्या मित्राला सांगितले की तिजोरीत बरेच पैसे दडले आहेत. तेव्हापासून 13 वर्षीय तरुणाने पीडितेचा पैशांसाठी छळ (Persecution Money) सुरू केला आणि पैसे देण्यासाठी धमक्या देऊ लागला. यानंतर पीडितेने आपल्या घरातील तिजोरीतून पैसे चोरून त्याला दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT