Hyderabad Professor Arrested Dainik Gomantak
देश

Hyderabad Professor Arrested: थायलंडच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

पुस्तक देण्याच्या बहाण्याने नेले घरी; विद्यार्थी संघटनांची निदर्शने, विद्यापीठाने केले निलंबित

Akshay Nirmale

Hyderabad Professor Arrested: हैदराबाद विद्यापीठातील एका प्राध्यापकाला परदेशी विद्यार्थिनीशी छेडछाड केल्यावरून अटक करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थिनी थायलंडची असून पुस्तक देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाने घरी नेले होते, असे तिने सांगितले. तिथे त्यांनी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे विद्यार्थिनीने म्हटले आहे.

(Hyderabad University Professor Molests Thailand Girl)

दरम्यान, या प्राध्यापकाला अटक करण्यात आलेली आहे. तसेच विद्यापीठानेही या प्राध्यापकाला निलंबित केले आहे. रवी रंजन असे या प्राध्यापकाचे नाव असून त्याचे वय 62 आहे. तो हिंदी विभागाचा प्राध्यापक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी रंजन यांनी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थिनीला घरी नेले. पुस्तक देणार असल्याचे त्यांनी तिला सांगितले होते. त्यांनी रात्री 9 वाजता तिला पुन्हा विद्यापीठात सोडले. तेव्हा तिच्या मैत्रिणींना ती रडत असल्याचे दिसून आले. तिची विचारपुस केली असता प्राध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. या विद्यार्थिनीला केवळ थाई भाषा येते.

ही घटना समोर आल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने प्राध्यापकाला निलंबित करण्याची मागणी करत आंदोलन केले. संबंधित विद्यार्थिनी रात्रभर कुलसचिवांना फोन करत होती, मेसेज करत होती, पण पलीकडून काहीही उत्तर देण्यात आले नाही. विद्यापीठ हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कारवाईला उशीर होत आहे, असे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, या आंदोलनानंतरच या प्राध्यापकाला निलंबित केले असून अटकही करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT