Court Dainik Gomantak
देश

धक्कादायक! उदरनिर्वाहासाठी पत्नीनं मागितली पोटगी; पतीनं कोर्टात सांगितलं आपलं खरं रुप

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील फॅमिली कोर्टात सुनावणीदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील फॅमिली कोर्टात सुनावणीदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण एका महिला आणि किन्नरशी संबंधित आहे, ज्यामध्ये महिलेने कोर्टात याचिका दाखल केली होती की तिचा पती तिला मेन्टेनन्ससाठी पैसे देत नाही. मात्र जेव्हा या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाली तेव्हा महिलेच्या पतीने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. पतीनेही असा युक्तिवाद केला की ऐकून सगळेच थक्क झाले. तो कोर्टात म्हणाला की, तो किन्नर आहे, मग तो लग्न कसा करु शकतो?

1985 मध्ये लग्न आणि नोकरीच्या बहाण्याने आग्रा येथे शिफ्ट झाले

एका महिलेने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये महिलेने 10 मार्च 1985 रोजी लग्न झाल्याचे सांगितले होते. त्यावेळी, तिचा पती सोन्या-चांदीच्या दुकानात कामाला होता. 1990 पर्यंत दोघेही उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील त्यांच्या वडिलोपार्जित घरात एकत्र राहत होते. मात्र, कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने दोघेही आग्रा शहरातील लोहमंडी येथे भाड्याच्या घरात राहू लागले. त्यानंतर दोघेही ग्वाल्हेरला आले आणि तिथे राहू लागले. महिलेचे म्हणणे आहे की, काही वेळाने पतीने तिला आग्रा येथे चांगली नोकरी मिळत असल्याचे सांगितले. तो तिथे एकटाच काम करेल आणि तो तिला वेळोवेळी भेटत राहील. याशिवाय तिला दरमहा 15 हजार रुपयेही देणार. त्यानंतर तो आग्र्याला गेला.

महिलेने कोर्टात सांगितले की, तिचा पती आग्र्याला गेल्यानंतर तिने अनेक महिने वाट पाहिली. मात्र, ना तिचा पती परत आला ना त्याने पैसे पाठवले. यानंतर महिलेने आग्र्याला जावून पतीचा शोध सुरु केला तेव्हा तिला कळले की तिचा पती किन्नरांबरोबर राहू लागला आहे. यानंतर महिलेने 9 डिसेंबर 2015 रोजी ग्वाल्हेरच्या फॅमिली कोर्टात भरणपोषणासाठी याचिका दाखल केली. मात्र या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पतीने कोर्टात सांगितले की, तो किन्नर आहे, तर मग तो तिच्याशी लग्न कसे करु शकतो. त्याने किन्नरांसोबतचे फोटोही कोर्टात सादर केले.

कोर्टाने किन्नरच्या बाजूने निकाल दिला

सुनावणीदरम्यान महिलेच्या एका नातेवाईकानेही साक्ष दिली की, ती त्यांच्या लग्नात उपस्थित होती. तिला लग्नाची कागदपत्रे कोर्टात सादर करता आली नसली तरी आधार कार्डावर तिच्या पतीचे नाव होते. पण कोर्टात किन्नर पतीने त्याचे नाव वेगळेच सांगितले. मात्र, सुनावणीनंतर कोर्टाने किन्नरच्या बाजूने निकाल दिला. मासिक 15,000 रुपये भरपाईसाठी महिलेने सादर केलेला अर्ज त्यांनी फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT