Amit Shah  Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir: अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर , जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Amit Shah In Jammu Kashmir: आजपासून अमित शाह यांचा दौरा सुरू होणार आहे.

दैनिक गोमन्तक

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पुढील तीन दिवस जम्मू-काश्मीरमध्ये राहणार असल्याने नवरात्रादरम्यान खोऱ्यातील राजकारणाला नवे वळण मिळू शकते. कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा जम्मू-काश्मीरचा हा तिसरा दौरा आहे. निवडणुकीच्या (Election) धामधुमीत होत असलेला हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अमित शाह गुर्जर आणि बकरवाल समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या व्यस्त कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. शाह आज संध्याकाळी 5 वाजता जम्मूला पोहोचतील. संध्याकाळी ते गुज्जर/बकरवाल आणि युवा राजपूत सभेच्या शिष्टमंडळांना भेटतील. रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकडीवर असलेल्या माता वैष्णो देवी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी सकाळी राजौरी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला शाह संबोधित करतील आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

अनेक प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी

श्रीनगर येथील राजभवनात 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री जम्मू-काश्मीरमधील (Kashmir) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, निमलष्करी दल, राज्य पोलीस आणि नागरी प्रशासनही सहभागी होणार आहेत. श्रीनगरमध्ये विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यापूर्वी शाह बारामुल्ला येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील.

संपूर्ण कार्यक्रम असा असेल

  • अमित शाह आज संध्याकाळी 5 वाजता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचतील.

  • तीन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अमित शाह आज संध्याकाळी गुर्जर, बकरवाल आणि राजपूत सभांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत.

  • 4 ऑक्टोबरला वैष्णोदेवी मंदिरात प्रार्थना करणार आहे.

  • मंदिरात प्रार्थना केल्यानंतर 4 ऑक्टोबरला राजौरी येथे जाहीर सभा होणार आहे.

  • 5 ऑक्टोबर रोजी ते श्रीनगरमध्ये नायब राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

SCROLL FOR NEXT