PM Modi In USA Video Dainik Gomantak
देश

PM Modi In USA Video: जन गण मन! राष्ट्रगीत गात, दिग्गज हॉलिवूड गायिकेने धरले, पीएम मोदींचे पाय

Ashutosh Masgaunde

PM Narendra Modi and Mary Millben: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रोनाल्ड रीगन सेंटरमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मंचावरून भारतीय राष्ट्रगीत जन-गण-मन गायले.

राष्ट्रगीतानंतर त्यांनी मंचावर उपस्थित पीएम मोदींच्या पायाला स्पर्श केला. आता याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात बोलताना मेरी मिलबेन म्हणाली की, पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होणे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.

मला अमेरिकेत जो सन्मान मिळतो...

रोनाल्ड रेगनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही सर्वांनी अमेरिकेत भारत आणि सर्वोत्तम भारताचे चित्र निर्माण केले आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मला अमेरिकेत जो सन्मान मिळतो आहे, त्याचे श्रेय अमेरिकेत तुम्ही केलेल्या मेहनतीला आणि अमेरिकेच्या विकासासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना जाते.

'नव्या भारतात पुन्हा आत्मविश्वास आला'

भारताच्या या प्रगतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचा आत्मविश्वास असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आज देश प्रगतीपथावर आहे, हा 140 कोटी भारतीयांचा विश्वास आहे.

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आमच्याकडून हा आत्मविश्वास हिरावून घेतला होता, असे पीएम मोदी म्हणाले. आज आपल्यासमोर असलेल्या नव्या भारतात हा आत्मविश्वास परत आला आहे.

हाच भारत आहे, ज्याला त्याचा मार्ग, दिशा माहीत आहे. हा असा भारत आहे, ज्याच्या मनात आपल्या निर्णयांबद्दल आणि संकल्पांबद्दल कोणताही संभ्रम नाही.

यादरम्यान अमेरिकन गायिका मेरी मिलबेनने भारताचे राष्ट्रगीत गायल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला.

मेरी मिलबेन यांच्या चमकादर सादरीकरणाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. त्यानंतर मेरी मिलबेन आली आणि त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला. मेरी मिलबेनला पायाला स्पर्श करताना पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांना थांबवले आणि तिच्याशी प्रेमाने हस्तांदोलन केले.

यानंतर पंतप्रधान मोदींनी मेरी मिलबेन यांना भारतीय शैलीत हात जोडून अभिवादन केले. प्रत्युत्तरात मेरी मिलबेन यांनीही हात जोडून पंतप्रधानांचे अभिवादन स्वीकारले.

यापूर्वी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनीही पीएम मोदींसमोर नतमस्तक झाले होते. त्यानंतर त्यांच्या या कृतीची जगभरात चर्चा झाली होती.

पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे स्वतः पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. मोदी विमानातून खाली उतरताच मरापे त्यांच्या पायाला हात लावताना दिसले.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरापे यांच्या पाठीवर थाप मारताना त्यांना उभे केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT