Crime News Dainik Gomantak
देश

Karnataka: कशासाठी? कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी! HIV पॉझिटीव्ह भावाचा बहीण आणि दाजीने केला खून

Karnataka Crime News: मल्लिकार्जुनच्या वडिलांना शंका आल्याने त्यांनी मुलगी आणि जावयाला याबाबत माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

कर्नाटक: एचआयव्ही पॉझिटीव्ह २३ वर्षीय तरुणाचा बहीण आणि दाजीने मिळून खून केला. कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबाच्या इज्जतीसाठी हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संशयित निशाला अटक केली असून, तिचा नवरा बेपत्ता आहे.

मल्लिकार्जुन (वय २३, रा. दुम्मी, होलालकेरे, चित्रदुर्ग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुनला एचआयव्ही संसर्गाची लागण झाल्याची माहिती उघड झाली होती. याबाबत त्याची बहीण निशाला समजात तिने पतीसोबत मिळून मल्लिकार्जुनचा खून केला. त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.

मल्लिकार्जुनला एचआयव्ही झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्यास कुटुंबाची इज्जत जाईल, या भीतीने बहिणीने हे पाऊल उचलल्याचे तपासातून समोर आले आहे.

मल्लिकार्जुन कामानिमित्त बंगळुरु येथे वास्तव्यास होता. तिथे एका खासगी कंपनीत तो काम करत होता. आई – बाबांना भेटण्यासाठी तो दुम्मी येथे वारंवार यायचा. २३ जुलै रोजी मित्रांसोबत गावाकडे येत असताना त्याचा अपघात झाला, त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांना देखील गंभीर जखम झाली.

चित्रदुर्ग येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला दावानागरे येथे पाठविण्यात. येथे तपासणीदरम्यान, त्याला एचआयव्हीची लागण झाल्याचे उघडकीस आले. फ्रॅक्चर असल्याने पायात रॉड घालून त्याला मोठ्या दवाखाण्यात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

निशा आणि त्याच्या पतीवर मल्लिकार्जुनला बंगळुरु येथील दवाखान्यात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.  २५ जुलै रोजी ते दवाखान्यात जात होते दरम्यान, मल्लिकार्जुनच्या मृतदेहासह माघारी परतले. रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

मल्लिकार्जुनच्या वडिलांना शंका आल्याने त्यांनी मुलगी आणि जावयाला याबाबत माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, नंतर त्याचा गळा आवळून खून केल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबाच्या इज्जतीसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT