Grand Cross of the Legion of Honour Dainik Gomantak
देश

Grand Cross of the Legion of Honour: पाच मुद्द्यांमध्ये जाणून घ्या, पीएम मोदींना मिळालेल्या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराची ऐतिहासिक पार्श्वभूमी

PM Modi: ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा पीएम मोदींना विविध देशांनी बहाल केलेल्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांच्या मालिकेतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

Ashutosh Masgaunde

History of Grand Cross of the Legion of Honour: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.

यासह पीएम मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. यासह, पंतप्रधान मोदी हे इतर प्रमुख जागतिक नेत्यांच्या पंक्तीत सामील झाले ज्यांना हा सन्मान देण्यात आला.

पाच पदव्या

लीजन ऑफ ऑनरचे विभाजन पाच पदव्यांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये नाइट, ऑफिसर, कमांडर, ग्रँड ऑफिसर आणि ग्रँड क्रॉस अशा पाच पदव्या आहेत.

याची स्थापना 1802 मध्ये फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांनी केली होती. यातील पाचवी पदवी नुकतीत पंतप्रधान मोदींना मिळाली आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

जागतिक दिग्गजांचा सन्मान

भूतकाळात, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हे जगभरातील निवडक प्रमुख नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी देण्यात आला आहे.

यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, किंग चार्ल्स - तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, जर्मनीच्या माजी चांसलर अँजेला मर्केल, बुट्रोस बुट्रोस-घाली आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस यांचा समावेश आहे.

परदेशी नागरिकही पुरस्कारासाठी पात्र

जरी फक्त फ्रेंच नागरिक लीजन ऑफ ऑनरमध्ये सामील होण्यास पात्र असले तरी, फ्रान्स किंवा त्याच्या आदर्शांना समर्थन देणारे इतर नागरिक देखील लीजनचा सन्मान मिळवू शकतात.

सध्या सुमारे 79,000 सदस्य आहेत आणि दरवर्षी फ्रान्स सुमारे 300 परदेशी नागरिकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

दोन शतकांचा इतिहास

द लीजन ऑफ ऑनर ही सर्व क्षेत्रात उत्युंग कार्य करणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना दिला जाणारा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार आहे. दोन शतकांपासून ते प्रमुख व्यक्तिमत्त्वांना बहाल करण्यात येत आहे.

उद्देश

नेपोलियनने मुळात राजकीय निष्ठा सुनिश्चित करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली. राजकीय भेटवस्तू आणि सवलती देण्यासाठी या संस्थेचा वापर केला जाई.

नेपोलियनच्या कालखंडानंतर फ्रेंच राजकीय व्यवस्था अनेक वेळा बदलली, परंतु लीजन ऑफ ऑनरचा वापर सुरूच राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT