Himalayan Glaciers  dainikgomantak
देश

भारतासाठी धोक्याची घंटा : हवामान बदलामुळे हिमालयातील बर्फ जलद वितळतोय

Climate change report : हवामान बदलामुळे हिमालयातील बर्फ जलद वितळतोय

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे आणि वाढत्या जागतिक तापमानामुळे हिमालयातील बर्फ जलद वितळतोय ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. हवामान बदलामुळे जलवायूमध्ये बदल होत आहेत. ज्यामुळे जगभरातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर मोठे संकट घेऊन कोसळणार आहे. सतत वितळणाऱ्या बर्फामुळे आणि होणाऱ्या हवामान बदलांमुळे देशात अतिवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघात असे संकटे येऊ शकतात. तर देशाचा अर्थिककणा असणाऱ्या शेतीवरही विपरित परिणाम होईल. ज्यामुळे उत्पादन कमी होईल. याबाबत इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज (IPCC) ने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये देशातील समुद्र किनाऱ्यावरील शहरे आणि हिमालयावर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. आता उशिर करून चालणार नाही, नाहीतर जगासाठी परिणाम खूप धोकादायक असतील. असे म्हटले आहे. (Himalayan glaciers rapidly melting due to climate change)

तसेच IPCC च्या अहवालानुसार जगातील निम्म्या लोकसंख्येला धोका आहे. सर्व प्रयत्न करूनही पर्यावरणात सुधारणा होताना दिसत नाही. हवामान बदलामुळे (Climate change ) आणि वाढत्या जागतिक तापमानात (temperature) जर 1 ते 4 अंश सेल्सिअसने वाढले तर देशात तांदूळ (Rice), मक्याचे उत्पादन कमी होईल. तर यामुळे संपूर्ण प्रदेशावर वेगवेगळे परिणाम होतील, असा इशारा ही या अहवालात दिला आहे.

तसेच आपल्या देशाला 7,500 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे असून त्यावर मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, पुरी आणि गोवा यांसारखे महत्वाची शहरे वसली आहेत. तेथे उष्णता (Heat) वाढू शकते. तसेच हिमालयातील बर्फ (Himalayan glaciers) जलद वितळल्याने समुद्रपातळीत वाढ होऊ शकते. ज्यामुळे या तटीय शहरात पूर सारख्या समस्यांना उद्भवू शकतात. तर चक्री वादळांचा (Cyclone) धोकाही होऊ शकतो. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून राहणीमानात सुधारणा करण्याच्या मार्गांचे कसा प्रयत्न करावा. याचा उल्लेख या अहवालात केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

ODI Record: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अजब रेकॉर्ड! शून्य धावा, शून्य विकेट्स; तरीही तो ठरला 'मॅन ऑफ द मॅच'!

SCROLL FOR NEXT