Himachal Pradesh Election Results 2022 Dainik Gomantak
देश

Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचलमध्ये भाजपला मोठा झटका, काँग्रेस आघाडीवर, कोण उधळणार गुलाल?

हिमाचल प्रदेशमध्ये सातत्यानं कल बदलतांना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे. यामध्ये गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतली आहे.

सुरुवातीला हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत होते. पण सातत्यानं हिमाचलमधील कल बदलत आहेत. सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.

  • हिमाचलमध्ये काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर

    सध्या विधानसभा निवडणुकांचे आकडे सातत्यांने बदलत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्या ठिकाणी बहुमताचा आकडा 35 चा आहे.

    सध्या विचार केला तर काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा गाठला आहे. पण अद्याप अंतिम निर्णय जाहिर झालेला नाही. काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये भाजपला धक्का देत काँग्रेस सत्तेचा गुलाल उधळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT