Love Story Dainik Gomantak
देश

Love Story: जगाला भारताचे वेड... शादाबसाठी बार्बराने ओलांडली पोलंडची 'सीमा'!

बार्बरा पोलकने झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसांडी पोलीस स्टेशन परिसरात राहणारा शादाब मलिक याच्याशी सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती.

Manish Jadhav

Love Story: प्रेम खरे असेल, तर प्रियकर-प्रेयसीला कोणतीही सीमा रोखू शकत नाही, ना धर्म ना जात… होय, हे विधान खरे करुन सातासमुद्रापार राहणाऱ्या बार्बरा पोलक या महिलेने आपला प्रियकर शादाब मलिकला भेटण्यासाठी झारखंडमधील हजारीबाग गाठले. 45 वर्षीय बार्बरा पोलक तिची सहा वर्षांची मुलगी अनन्यासोबत भारतात आली आहे.

दरम्यान, 2021 मध्ये पोलंडची (Poland) रहिवासी असलेल्या बार्बरा पोलकने झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसांडी पोलीस स्टेशन परिसरात राहणारा शादाब मलिक याच्याशी सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे, तिने शादाबला भेटण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला.

बार्बरा पोलकनेला 5 वर्षांसाठी व्हिसा मिळाला

प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर पोलंडच्या बार्बरा पोलकला पाच वर्षांसाठी भारतात येण्याचा व्हिसा मिळाला. व्हिसा मिळताच तिने थेट पोलंडहून दिल्लीमार्गे झारखंडमधील (Jharkhand) हजारीबाग गाठले. सुमारे पाच दिवस हजारीबागमधील एका हॉटेलमध्ये राहिल्यानंतर ती प्रियकराला भेटण्यासाठी हजारीबागच्या कटकमसंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुत्रा गावात पोहोचली.

दुसरीकडे, या परदेशी महिलेला पाहण्यासाठी खुत्रा गावात लोक जमले होते. या प्रेमकथेतील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे बार्बरा पोलकचे वय 45 वर्षे आहे, तर तिचा प्रियकर शादाब मलिकचे वय 35 वर्षे आहे.

शादाब पोलंडला जाणार

शादाबने हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा केला आहे आणि तो त्याच्या करिअरच्या शोधात होता. यादरम्यान त्याची पोलंडची रहिवासी बार्बरा पोलक हिच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. आता शादाब मलिकही प्रेम मिळाल्यानंतर पोलंडला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करण्याची तयारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT