देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपू्र्ण देशात पार पडला. राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाचं (Republic Day 2022) नेत्रदिपक असे संचलन झाले. विविध राज्यांच्या चित्ररथाने विविधतेत एकता असलेल्या संपूर्ण भारत देशाचे दर्शन घडवले. देशाच्या तिनही दलाच्या शक्तीचं प्रदर्शन झालं. सर्व दलांचे पथसंचलन झाले.
हा सोहळा सुरू असतांनाच चर्चा मात्र एकाच गोष्टीची होत होती. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी घातलेल्या ड्रेसची. ज्या प्रमाणे आज चित्ररथाने विविधतेत एकतेचे दर्शन घडवले अगदी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra modi) यांनी त्यांच्या पेहेरावातून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दिवंगत सीडीएस बीपिन रावत (Bipin Rawat) हे घालत होते अशी टोपी आणि गमछा परिधान करून मणिपूर आणि उत्तराखंड चे दर्शन घडवले.
देशात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विशेष म्हणजे सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही निवडणुका होत आहेत. त्यामुळे मोदींनी केलेला पेहराव हा निवडणुका पाहून केलाय का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
उत्तराखंडची टोपी
उत्तराखंड (Uttarakhand) येथे विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. तर सीडीएस बीपिन रावत हे उत्तराखंड चे होते. येथिल लोकं टोपी परिधान करतात हे इथले वैशिष्ट आहे. रावत सुध्दा अशी टोपी परिधान करायचे. बीपिन रावत यांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झाले. सीडीएस बीपिन रावत यांना कालच मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं त्यांना श्रद्धांजली म्हणूनच मोदींनी ही टोपी परिधान केल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपुर्वी बीपिन रावत यांची कन्या निवडणुक लढवणार आहे असी सुध्दा चर्चा होती. मोदींनी आज उत्तराखंडची ओळख असलेली टोपी परिधान केल्यामुळे त्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जात आहे.
हिमालयीन राज्यांचे प्रतिक व टोपी
ही टोपी काळ्या रंगाची असून ट्रेंडी आणि तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. या पारंपारिक टोपीत काही नवीन गोष्टी जोडण्यात आल्या आहेत. या टोपीत ब्रह्म कमळ हे राज्य फूल लावण्यात आलं आहे. तसेच टोपीला एक पट्टी लावण्यात आली आहे. त्यावर चार रंग असून हे रंग जीव, निसर्ग, जमीन आणि आकाशाचं प्रतिक आहे आणि हे रंग हिमालयीन (Himalayas) राज्यांचे प्रतिक सुध्दा आहेत. या टोपीला देशातच नाही तर विदेशातही प्रचंड मागणी आहे.
मणिपूरचा गमछा
टोपीसह मोदींनी गळ्यात मणिपुरी गमछाही परिधान केला होता. मणिपूरमध्ये(Manipur) दोन टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. आणि येथे भाजपचे एन. बीरेन सिंह हे मुख्यमंत्री आहेत. सरकारची या निवडणुकीत चांगलीच कसोटी लागणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यात मोदींनी मणिपुरी गमछा परिधान केला आहे. त्यामुळे त्याकडे राजकीय संकेताच्या अर्थाने पाहिले जात आहे.
टोपी - गमछा ठरणार का बुस्टर?
उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी 70 जागांसाठी तर मणिपूर मध्ये 60 जागांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेला हा पेहेरावातून मणिपूर आणि उत्तराखंडच्या नागरिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे. सध्या कोरोनाच्या (Covid) बुस्टर डोज ची चर्चा सर्विकडे सुरू आहे मात्र नरेंद्र मोदींनी परीधान केलेली टोपी व गमछा हे भाजपसाठी बुस्टर बनणार का? हे मात्र येणारा निवडणूकीचा निकालच ठरवेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.