Mining

 

Dainik Gomantak

देश

Haryana: भिवानीमध्ये भीषण अपघात! खाण परिसरात डोंगर कोसळल्याने 10 ते 15 जण बेपत्ता

दादम खाण परिसरात दरड कोसळल्याने खाणकामात (Mining) गुंतलेली सुमारे डझनभर वाहने गाडल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Manish Jadhav

हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील तोशाम ब्लॉकमध्ये दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दादम खाण परिसरात दरड कोसळल्याने खाणकामात (Mining) गुंतलेली सुमारे डझनभर वाहने गाडल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी सुमारे 10 ते 15 जण बेपत्ता असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. तोशाम ब्लॉकच्या दादम खाण परिसरात डोंगराचा मोठा भाग कोसळला.

मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री जेपी दलाल (Agriculture Minister JP Dalal) घटनास्थळी पोहोचले आहेत. अद्याप दरड कोसळण्याचे कारण समजू शकलेले नाही. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या भागातील खाणकामावरील बंदी उठवल्यानंतर दादम खाण परिसरात आणि टेकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरु आहे.

बचाव कार्यात अडचणी येतायेत !

एनजीटीच्या बंदीमुळे तोशामच्या दादम परिसरात खाणकाम बंद करण्यात आले होते. शुक्रवारी बंदी उठल्यानंतर या परिसरात खाणकाम सुरु झाले होते. अशा स्थितीत सकाळी साडेआठ वाजता खाणकाम सुरु असताना संपूर्ण डोंगरच कोसळला. त्याचवेळी या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. अशा परिस्थितीत यामध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. त्याचवेळी प्रशासनाकडून दगड हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ढिगाऱ्याखाली किती लोक गाडले गेले याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT