PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Modi: हार्डवर्क की स्मार्टवर्क? विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मोदींचे उत्तर

PM Modi: काहीजण फक्त हार्डवर्क करत राहतात. तुम्ही हार्डवर्क स्मार्टपणे करा. आवडत नसलेला विषय आधी अभ्यासा. तुम्ही स्वत: ला कमी समजू नका.

दैनिक गोमन्तक

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परिक्षे पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोर्डाच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. दिल्लीतील तालरकोटा स्टेडियम मधून पंतप्रधान मोदी परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन करताना दिसले.

पंतप्रधान मोदींनी परिक्षेबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे की, बोर्डाची परिक्षा( Board Exam ) जवळ येत आहे त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. परिक्षेत गैरप्रकार करण्यासाठी काहीजण खूप युक्त्या करतात आणि त्यासाठी वेळ घालवतात.

विद्यार्थ्यांनी परिक्षेत गैरप्रकार करण्यापेक्षा अभ्यास केला पाहिजे. कुणी शॉर्टकट वापरत असेल तर तुम्ही दुर्लक्ष करा. काहीजण फक्त हार्डवर्क करत राहतात. तुम्ही हार्डवर्क स्मार्टपणे करा.आवडत नसलेला विषय आधी अभ्यासा. तुम्ही स्वत: ला कमी समजू नका.

प्रत्येकात इतरांपेक्षा काहीतरी वेगळे गुण असतात.तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा.आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा. विद्यार्थ्यांच्या पालकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी( PM Modi ) पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे पालकांवर टाकू नये.

कुटुंबाच्या काही अपेक्षा असतील तर ते चूक नाही मात्र त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांवर पालकांनी दबाव टाकू नये, असे म्हटले आहे. त्याचबरोबर, समाजासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नये, असाही सल्ला पंतप्रधान मोदींनी पालकांना दिला आहे.

त्याचबरोबर, काहीजणांना वेळेचे व्यवस्थापन करण्यात अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या आईकडून वेळेचे व्यवस्थापन शिकले पाहिजे. काम केल्याने कधी थकत नाही तर काम केल्याने थकवा निघून जातो असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

ही बोर्डाची परिक्षा आहे मात्र आयुष्यात पावलोपावली परिक्षा आहे असेही मोदींनी म्हटले आहे. दरम्यान,या चर्चेत महाराष्ट्रा( Maharashtra )चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT