Hairstylist Jawed Habib spat on womans hair in Muzaffarnagar

 

Dainik Gomantak

देश

Viral Video: 'इस थूक में जान है' म्हणत जावेद हबीब महिलेच्या केसांवर थुंकला

लोकप्रिय हेयर एक्सपर्ट जावेद हबीबचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि वादात सापडला

दैनिक गोमन्तक

जावेद हबीब (Jawed Habib) हे देशातील सर्वात लोकप्रिय हेयर एक्सपर्ट आहे. भारताशिवाय जगातील इतर देशांमध्ये त्याची अनेक सलून आहे. अर्थात त्यांचे सलून तुमच्या शहरातही कार्यरत असेल. कारण जावेद हबीब हे त्याच्या सलूनसोबतच हेअरस्टायलिस्टसाठीही खूप प्रसिद्ध आहे, पण अलीकडेच त्याचा सोशल मीडियावर व्हायरल एक व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आणि तो वादात सापडला आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

जावेद हबीबचा व्हिडिओ व्हायरल

हेयर एक्सपर्ट जावेद हबीब केसांची (Hair Care) काळजी कशी घ्यायची यासाठी हेअर स्टाइलबद्दल माहिती देतांनानाचा हा व्हिडिओ आहे. केस मजबूत कसे ठेवायचे, एखाद्या व्यक्तीचे आणि केसांचे सौंदर्य कसे वाढवायचे याबद्दल जावेद हबीब यांच्या सल्ल्यावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. त्यामागचे कारण म्हणजे त्याचे काम आणि त्याचा अनुभव, पण आता या हेयर एक्सपर्टवरच सोशल मीडियावर लोकांकडून टीका होतांना दिसत आहे.

जावेद हबीब महिलेच्या केसांवर थुंकला

जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका सेमिनारमध्ये सर्वांसमोर एका महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील असल्याचे दिसत आहे, यामध्ये एक महिला स्टेजवर सलूनच्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे. यावेळी उपस्थित लोकांना टिप्स देताना जावेद हबीब महिलेच्या केसांवर थुंकतो.

जावेद हबीब म्हणाला - या थुंकीत जीव आहे

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला खुर्चीवर बसली आहे आणि जावेद हबीब कंगव्याने तिचे केस सेट करत आहेत. यादरम्यान तो "मला हे केस घाणेरडे दिसत आहेत, शॅम्पू केला नाही की हे असेच गलिच्छ आहे. पाण्याची कमतरता असेल तर लक्षपूर्वक ऐका.." असे म्हणत जावेद महिलेच्या केसांवर थुंकतांना दिसला आणि त्यावर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या, त्यानंतर "या थुंकीत जीव आहे," असा जोकही जावेद यावेळी करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT