H3N2 Influenza Virus Dainik Gomantak
देश

H3N2 वेगाने पसरतोय, केंद्राकडून नवी नियमावली जाहीर,वाचा एका क्लिकवर

H3N2 व्हायरसचा वाढता धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झाले असून सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशभरात कोरोनानंतर 'H3N2' व्हायरस झापाट्याने पसरत आहे. या व्हायरसमुळे देशात दोघांचा बळी गेला आहे. केरळ आणि हरियाणा राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्यांना कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे सुनिश्चित करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्हायरस या सारख्या आजारासाठी एक पत्र लिहिले आहे.

एच1 एन1 आणि एच 3 एन 2 सारख्या गंभीर तीव्र श्वसनाच्या आजारासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन या पत्रातून केले आहे. काही राज्ये सकारात्मक दरात वाढ नोंदवल्या, असे देखील पत्रात म्हटले आहे. निती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहिले आहे.

H3N2 व्हायरसचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा निश्चित करावा, रुग्णांची तपासणी करावी, असे सांगितलं आहे.


नीती आयोगाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय -

  • गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे.

  • नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

  • शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल धरावा.

  • ताप, सर्दी व अंगदुखीची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

H3N2 इन्फ्लूएंझाची लक्षणे कोणती?

- श्वासोच्छवासाचा त्रास
- सतत ताप येणे
- छाती किंवा पोटदुखी
- स्नायू दुखणे
- अशक्तपणा आणि चक्कर येणे
- जुन्या आजाराची पुनरावृत्ती
- सर्दी आणि खोकला

  • H3N2 व्हायरस या लोकांसाठी अधिक धोकादायक

- 5 वर्षांखालील लहान मुले
- 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध
- गर्भवती महिला
- श्वसन आणि दमा रुग्ण
- मधुमेह रुग्ण
- कर्करोग रुग्ण

H3N2 व्हायरस पासून असा करावा बचाव

  1. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे

  2. खोकताना आणि शिंकताना नाकाला रुमाल लावावा

  3. प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे

  4. बाहेर तळलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे

  5. हात नेहमी धुत रहावे

  6. जास्त पाणी प्यावे

  7. ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.

  8. ताप 2-3 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT