खरा राम रहीम कुठे आहे याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे. न्यायमूर्ती करमजीत सिंग (Justice Karamjit Singh) यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. (Gurmeet Ram Rahim Updated News)
याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की त्यांना काही अज्ञात स्त्रोतांकडून माहिती मिळाली आहे की, वास्तविक राम रहीमचे अपहरण करण्यात आले आणि एकतर त्याला मारण्यात आले आहे किंवा मारले जाऊ शकते. खर्या प्रमुखाचे अपहरण झाल्यानंतर बनावट तुरुंगात टाकण्यात आले असून, नकली खऱ्याचे करून सिंहासन बळकावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप डेराच्या अनुयायांनी केला. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की काही दिवसांपूर्वी तुरुंगात असलेल्या राम रहीमला त्यांचे मित्र भेटले होते जे त्याला ओळखू शकत नव्हते. कथित राम रहीमचे हावभाव खऱ्यांच्या तुलनेत खूप वेगळे होते.
याचिकेत म्हटले की, डेरा प्रमुख राम रहीमची उंची एक इंचाने वाढली आहे, त्याच्या बोटांची आणि पायाची लांबी वाढली आहे. कथित डेरा प्रमुखाने अलीकडेच एक व्हिडिओ जारी केला होता ज्यात याचिकाकर्त्याने दावा केला आहे की त्याने 'चेहऱ्यावर आणि हाताचा मेकओव्हर केला होता.
डेरा सच्चा सौदाचा खरा प्रमुख गुरमीत राम रहीम याचे अपहरण करण्यात आले असून राम तुरुंगामध्ये आहे. रहीम बनावट असल्याचा दावा करणारी याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. हा दावा डेरा प्रमुखाचा अनुयायी अशोक कुमार आणि अन्य 18 जणांनी केला.
या याचिकेत हरियाणा सरकार, हनीप्रीत आणि डेराचे प्रशासक पीआर नैन यांना पक्षकार बनवण्यात आले. राम रहीमच्या सत्यतेची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली. काही अज्ञात सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.