Morbi Cable Bridge Twitter/ @ANI
देश

Gujarat: मोरबीमध्ये भीषण अपघात, झुलता पूल कोसळल्याने 141 जणांचा मृत्यू

Gujarat s Morbi Cable Bridge Collapse: मच्छू नदीतील पूल कोसळल्याने नदीत पडून 141 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat s Morbi Cable Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक अपघात समोर आला आहे. मच्छू नदीतील पूल कोसळल्याने नदीत पडून 141 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, पाच दिवसांपूर्वी नूतनीकरणानंतर केबल पूल पुन्हा सुरु करण्यात आला होता.

पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडले. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. पूल कोसळल्यानंतर नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्विट करत आपल्या संवेदना आणि प्रार्थना पीडितांसोबत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडले. बचावकार्य सुरुच आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांशी अपघाताबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यास सांगितले आहे.

Gujarat s Morbi Cable Bridge Collapse

दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि इतर राज्य अधिकाऱ्यांशी बोलून स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले असल्याचे सांगितले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) देखील लवकरच घटनास्थळी पोहोचत आहे, असेही शाह म्हणाले.

तसेच, आम आदमी पार्टी (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT