Women Dainik Gomantak
देश

Gujarat मध्ये गरब्यावरुन गदारोळ, नेमका काय आहे GST चा संपूर्ण वाद

Gujarat News: गुजरातमध्ये सध्या गरब्यावर लावण्यात जीएसटीवरुन विवाद सुरु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat News: गुजरातमध्ये सध्या गरब्यावर लावण्यात जीएसटीवरुन विवाद सुरु झाला आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (AAP) यांनी सरकारकडे व्यावसायिक गरबा कार्यक्रमांच्या प्रवेश तिकिटांवर आकारला जाणारा 18% GST मागे घेण्याची मागणी केली आहे. गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दरम्यान, काँग्रेस (Congress), आपचे कार्यकर्ते प्रवेश तिकिटावरील जीएसटीला विरोध करत असताना, गुजरातचे शिक्षणमंत्री आणि भाजप (BJP) प्रवक्ते जितू वाघानी यांनी 2017 पासून गरब्यासह सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांवर कर लावण्यात आल्याचा पलटवार केला आहे. काँग्रेसशासित राज्यांसह सर्व राज्यांनी याला सहमती दर्शवली असल्याचेही ते म्हणाले.

आता हा वाद का निर्माण झाला?

'युनायटेड वे ऑफ बडोदा' नावाच्या एनजीओने एंट्री पासची किंमत आणि जीएसटीची माहिती त्यांच्या वेबसाइटवर शेअर केल्यानंतर एंट्री पासवरील जीएसटीचा (GST) मुद्दा समोर आला. ही NGO गरबा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओळखली जाते. वेबसाइटनुसार, 9 दिवसांसाठी पुरुषांच्या पासची किंमत 4,838 रुपये आहे, ज्यामध्ये 4100 रुपये प्रवेश शुल्क आणि 18 टक्के जीएसटी म्हणजेच 738 रुपये समाविष्ट आहेत. महिलांना प्रवेशासाठी 1298 रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये 1,100 रुपये शुल्क आणि 198 रुपये जीएसटी समाविष्ट आहे.

काँग्रेस आणि आपमध्ये नाराजी आहे

जीएसटी हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि आपने मंगळवार आणि बुधवारी वडोदरा, सुरत आणि वलसाडमध्ये निदर्शने केली. वडोदरा शहरातील काँग्रेस अध्यक्षांसह सुमारे 10 कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गरबा केला. बुधवारी, आप कार्यकर्त्यांनी सुरत आणि वडोदराच्या रस्त्यांवर गरबा केला, त्यानंतर अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT