GST collection again over Rs 1 lakh crore
GST collection again over Rs 1 lakh crore 
देश

ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी संकलन थोडे कमीच

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्‍या महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील महिन्यात सरकारला ‘जीएसटी’मधून १.०४ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी संकलन थोडे कमी होते. 


ऑक्टोबर २०२० मध्ये जीएसटी संकलन १.०५ लाख कोटी रुपये होते. त्याचबरोबर, मागील वर्षाच्या नोव्हेंबरच्या तुलनेत हे संकलन १.४ टक्के जास्त आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारला ‘जीएसटी’मधून १,०३,४९१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. 


अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘जीएसटी’च्या महसुलातील ही वाढ मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी जास्त होती. मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत वस्तूंच्या आयातीमध्ये ४.९ टक्के वाढ झाली होती. त्याचबरोबर देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ०.५ टक्क्यांनी जास्त होता.

असा आला एकूण ‘जीएसटी’
नोव्हेंबर २०२० मध्ये ‘जीएसटी’चा एकूण महसूल १,०४,९६३ कोटी रुपये आहे. त्यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) १९,१८९ कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) २५,५४० कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) ५१,९९२ कोटी रुपये आहे. (त्यातील २२,०७८ कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर मिळालेले आहेत). 
यामधील उपकरामधून ८,२४२ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर मिळालेल्या ८०९ कोटी रुपयांचा समावेश आहे) आले आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT