Soldier  Dainik Gomantak
देश

श्रीनगरमध्ये पोलिस आणि सुरक्षा दलाच्या पथकावर ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू

एका दहशतवाद्याला पकडल्याचा दावा गांदरबल पोलिसांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील लाल चौकात दहशतवाद्यांनी रविवारी हल्ला केला. या हल्ल्यात ग्रेनेडचा वापर करण्यात आला होता. हल्ल्यामध्ये 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल चौकात एका संशयित दहशतवाद्याने पोलिस (Police) आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर ग्रेनेडने हल्ला केला. श्रीनगर जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली आहे, असे एका वरिष्ट पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद्याला अटक

एका दहशतवाद्याला (Terrorist) पकडल्याचा दावा गांदरबल पोलिसांनी केला आहे. गांदरबल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) च्या 24 RR आणि 115 बटालियनने पकडले आहे. मोहम्मद अल्ताफ वानी असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

SCROLL FOR NEXT