Grenade attack in Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

जम्मू काश्मीरात ग्रेनेड हल्ला

दोन सीआरपीएफ जवान आणि एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Jammu Kashmir)

दैनिक गोमन्तक

जम्मू कश्मीरच्या (Jammu and Kashmir) बारामुल्ला (Baramullah) शहरात ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान (CRPF) आणि एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या या धमाकेदार हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) चे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. ताज्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात एक नागरिक देखील जखमी झाला आहे.

बारामुल्ला शहरातील खानपुरा पुलाजवळ दहशतवाद्यांनी दुपारी सुरक्षा दलावर ग्रेनेड फेकला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले असून जखमी सुरक्षा कर्मचा्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी हा परिसर घेरला गेला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, बारामुल्ला येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत.पण याबात आणखीनही सविस्तर माहिती मिळू शकली नाही. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ग्रेनेड हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस आणि सुरक्षा दल करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT