Google welcomes the new year in a unique way by creating doodles

 

Dainik Gomantak

देश

New Year 2022: गुगलने डुडल बनवून अनोख्या पद्धतीने केले नव्या वर्षाचे स्वागत

गुगलने (Google) 2022 या कॅप्शनसह कॅप आणि कँडीसह नवीन आणि गोंडस डुडल बनवून नवीन वर्षाचे (New Year) स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

गुगलने नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी एक अनोखे डुडल बनवले आहे. रात्री 12 वाजल्यापासून हे डुडल लाईव्ह करण्यात आले. गुगलने आकर्षक डुडलमध्ये (Doodle) रंगीत टोपी आणि कँडी दाखवली आहे. 2022 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता ते तयार झाले आणि रात्री 12 वाजता अॅनिमेशन (Animation) सुरु झाले.

Google चे आकर्षक डुडल

जगभरातील लोक 2021 ला निरोप देऊन 2022 या नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. गुगलने तयार केलेल्या डुडलमध्ये जांभळ्या रंगाची कँडी मधून तुटून त्यातून रंगीत टोप्या बाहेर येताना दिसत आहे. गुगलच्या या आकर्षक डुडलवर क्लिक केल्यावर एक पागे दिसेल, ज्यामध्ये नवीन वर्षाच्या डूडल्सही संबंधित अनेक माहिती आहे. तसेच 2022 चे स्वागत करताना रंगीबेरंगी कागदाचे तुकडे वरून खाली पडताना दिसतात.

कोरोना (Corona) काळात सुद्धा भारतासह (India) संपूर्ण जगणे नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. जगभरातील अनेक शहरांमध्ये निर्बंधांसह पार्टी आणि कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लोक एकमेकांना सुख- समृद्धी आणि नाव वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान लोकांना गुगलच्या डुडलच्या आकर्षित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT