Wife Dainik Gomantak
देश

Rajasthan: 'तलाक, तलाक, तलाक' म्हणणाऱ्या नराधम नवऱ्याने बायकोवर केला हल्ला

Rajasthan: राजस्थानमधील बांसवाडा शहरात एका व्यक्तीने पत्नीला रस्त्यात तिहेरी तलाक देऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Rajasthan News: राजस्थानमधील बांसवाडा शहरात एका व्यक्तीने पत्नीला रस्त्यातच ट्रिपल तलाक देऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीने पहिल्या पत्नीला रस्त्यातच तीनदा 'तलाक, तलाक, तलाक' असे म्हटले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर पत्नीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. पीडितेची आई तिला वाचवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात राजतलाब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राजतलाब पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील दाहोद रोडवरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. आई साबेरासोबत बाजारात खरेदीसाठी जात असताना आरोपी पती रिजवान अहमद शादने पत्नीवर हल्ला केला. याआधी दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पतीने तिला खाली ढकलून दुचाकीने धडक दिली. दुसरीकडे, माहिती मिळताच हेडकॉन्स्टेबल महिला पोलिस घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमी झालेल्या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, 'आरोपी (Accused) इंदिरा नगरच्या एकजन कॉलनीत राहतो. तो त्याच्या मेहुण्याजवळ राहून वास्तुविशारद म्हणून काम करत आहे.'

तलाक, तलाक, तलाक याबद्दल आधीच बोललो आहे

महिला पोलिस स्टेशनचे एएसआय लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, '5 दिवसांपूर्वी पीडित परवीनच्या वतीने हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत परवीनने आरोपीविरुद्ध तीन वेळा तलाक दिल्याचे म्हटले आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.'

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह आरोपीसोबत 28 डिसेंबर 2021 रोजी झाला होता. लग्नानंतर आठ दिवसांनी तो हुंड्यासाठी तिचा छळ करु लागला. नुकतेच आरोपीने रतलाम येथील तरुणीशी दुसरे लग्न केले. राजतलाब पोलिस ठाण्याचे प्रभारी रामरुप मीना यांनी सांगितले की, 'गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास केला जात आहे. तात्काळ कारवाई केली जाईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT