girls beats man with sandals on the road in bilaspur video viral  Dainik Gomantak
देश

चित्रपटात काम देण्याचं आमिष, मुलींनी भर रस्त्यात चप्पलनं मारलं

मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये केला शूट

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडची न्यायिक राजधानी बिलासपूर येथील ही बातमी लोकांसाठी धडा ठरू शकते. दोन तरुणींनी एका पुरुषाला चप्पलने मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा तरुण वारंवार मुलीची छेड काढत होता. मुलींनी प्लॅन करून तरुणाला भेटायला बोलावले आणि बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ (Video) तीन दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. तोरवा येथील रहिवासी असलेला तरुण चित्रपटात स्पॉट बॉय म्हणून काम करतो. चित्रपटामध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तो नंतर अनेक मुलींचे नंबर घेऊन त्यांची छेड काढत असे. तसेच हा तरुण तरुणीला फोन करून त्रास देत होता.

मुलीने ही माहिती तिच्या मैत्रिणीला दिली. त्यानंतर तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने तरुणीने कोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलासतळजवळ बोलावले.

मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला

दोन्ही मुली आधी तिथे हजर होत्या. दरम्यान, तरुण तेथे पोहोचताच तरुणींनी त्याला दुचाकीवरून उतरण्याची संधीही दिली नाही आणि त्याला चप्पलनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणाला मारहाण होत असल्याचे पाहून तेथे लोकांचा जमाव जमला. यादरम्यान कोणीतरी मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. आता तोच व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, अद्याप पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT