gangster vikas dubey Dainik Gomantak
देश

गँगस्टर विकास दुबेची 67 कोटींची मालमत्ता जप्त; योगी सरकारने घेतला निर्णय

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पोलीसांशी झालेल्या झटापटीत दुबे मारला गेला होता

दैनिक गोमन्तक

उज्जैन : 2020 साली उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये बिकरूची दरम्यान एक घटना घडली होती. या घटनेत कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी बिकरू गावात पोलिसांवर गोळीबार केला होता. गोळीबारात तब्बल ८ पोलिस शहीद झाले होते. यानंतर विकास दुबे फरार झाला होता. यानंतर विकासला १० जुलै रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पकडण्यात आले. यावेळी पोलीसांशी झालेल्या झटापटीत तो मारला गेला होता. यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवत त्याच्यावर अवैध संपत्तीचा ठपका ठेवत संपत्तीवर जप्तीची टाच आणली आहे.(Gangster Vikas Dubey's assets worth 67 crore seized )

या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बिकरू घटनेनंतर चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या नातेवाईकांची ६७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कानपूरच्या जिल्हा न्यायालयाने विकास दुबे आणि त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने बिकरू, चौबेपूर, कानपूर देहाट, लखनौ येथील १३ स्थावर आणि १० जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विकास दुबे यांच्या पत्नी, आई आणि दोन्ही मुलांची मालमत्तांचा समावेश आहे.

काय घडली होती घटना ?

२ जुलै २०२० रोजी यूपीच्या कानपूरमध्ये बिकरूची घटना घडली होती. या प्रकरणात विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या बिकरू गावात पोलिसांवर गोळीबार केला होता. यात ८ पोलिस शहीद झाले होते. या घटनेनंतर विकास दुबे फरार झाला होता. पोलिसांनी कारवाई करत विकासच्या अनेक साथीदारांसोबत चकमक केली आणि विकासला १० जुलै रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पकडण्यात आले होते.

विकास दुबेला अटक केल्यानंतर यूपी पोलीस आणि एसटीएफ विकासला रस्त्याने कानपूरला आणत होते, पण कानपूरला पोहोचण्यापूर्वीच यूपी पोलिसांची त्याच्याशी चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने वाटेत पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत चकमकीत ठार केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT