Rohini Court  Dainik Gomantak
देश

दिल्ली कोर्टात गँगस्टरची गोळ्या झाडून केली हत्या

गोगी वर खून आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला तिहार जेल (Tihar Jail)मध्ये ठेवण्यात आले होते. जिथून त्याला त्यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात (Court)हजर करण्यात येत होते.

दैनिक गोमन्तक

दिल्ली: मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घेतली आहे. रोहिणी कोर्ट नंबर 2 मध्ये जितेंद्रला हजर केले असता वकिलांच्या वेशभूषा करून आलेल्या दोघांनी त्याला गोळ्या घालून त्याची हत्या केली. त्याचा जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लगेचच पोलिसांनी शूटआऊट करून दोघांना ठार केले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हा एन्काऊंटर केला. हल्ला करणारे विरोधी गटातील होते असे सांगितले जात आहे.

जितेंद्र गोगी, अनेक गुन्हेगारी (Crime)प्रकरणात तो दोषी आढळून आला होता. सध्या त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. सुनावणीसाठी न्यायालयात हजर करताना प्रतिस्पर्धी सदस्य वकीलांचे कपडे घालून कोर्टात दाखल झाले. त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. कोर्टाच्या आवारात कडक सुरक्षा असून प्रत्येकाची तपासणी गेटवरच केली जाते. परंतु हल्लेखोरांनी वकिलांच्या कपड्यात असल्यामुळे ते सुरक्षा तपासणीतून सहज निसटले.

दिल्ली पोलीस गुंड जितेंद्र गोगी याला एक खटल्याच्या सुनावणीसाठी रोहिणी कोर्टात आणले होते. या दरम्यान वकिलाच्या कपड्यात येऊन दोघांनी गोळीबार केला. प्रतिउत्तर देत पोलिसांनी दोघांना जागीच ठार केले. यानंतर लगेच गोगीला तातडीने रुग्णालयात (hospital)नेण्यात आले, आणि त्याचा मृत्यू झाला. जितेंद्र गोगी वर खून आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला तिहार जेल मध्ये ठेवण्यात आले होते. जिथून त्याला त्यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

Bicholim: डिचोलीतील ‘पे पार्किंग’ प्रस्ताव अजूनही घुटमळतोय! कंत्राटदार कंपनीचा प्रतिसाद नाही; पालिकेसमोर प्रश्नचिन्ह

Goa Crime: कारमधून ओढून शेतात मारहाण, स्क्रूड्रायव्हर - फोन जप्त; रेहबर खान हत्याप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला

Laxmidas Borkar: गोमंतपुत्राचा गौरव! स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार 'लक्ष्मीदास बोरकर' यांच्या सन्मानार्थ टपाल साहित्य प्रकाशित

SCROLL FOR NEXT