PM Modi| G20Summit twitter
देश

PM मोदी आज G20 व्यासपीठावरून जगाला दाखवणार भारताचे व्हिजन

G20 Summit: G-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  सोमवारी म्हणजेच 14 नोव्हेंबरला इंडोनेशियातील बाली शहरात पोहोचले आहेत. भारत, अमेरिका, चीनसह अनेक देशांचे प्रमुख G-20 परिषदेत (G20 Summit) सहभागी होत आहेत. या काळात पंतप्रधान मोदी 20 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज 15 नोव्हेंबरला बाली (Bali) भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी मोठ्या उत्साहात एकमेकांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.  

G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासोबतच पंतप्रधान मोदी 10 सहभागी देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. पीएम मोदी बालीमध्ये जवळपास 45 तास राहणार आहेत. G-20 परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी इंडोनेशियातील प्रवासी भारतीयांनाही (Indians) बोधित करतील.

  • अनेक नेत्यांना भेटणार

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले, ही शिखर परिषद तीन सत्रांमध्ये होणार असून या तीन सत्रांमध्ये पंतप्रधान मोदी इतर जागतिक नेत्यांसह सहभागी होणार आहेत. G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान जागतिक नेत्यांनाही भेटणार आहेत. त्यात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रा आणि जर्मनीचे चांसलर, इंडोनेशियाचे राष्ट्रपती यांचा समावेश आहे. दरम्यान, पीएम मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेचीही चर्चा आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पीएम मोदी एकमेकांना भेटणार आहेत.

  • पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट होणार आहे

G-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट होऊ शकते. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदींसोबतची ही पहिलीच भेट असेल. पीएम मोदी आणि ऋषी सुनक यांच्यातील ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. यादरम्यान दोघांमध्ये युक्रेन-रशिया युद्धाबाबत चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे. 

  • पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाला संबोधित करणार

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाला रवाना होण्यापूर्वी, पंतप्रधान मोदी म्हणाले की 15 नोव्हेंबर रोजी बाली येथे भारतीय समुदायाला संबोधित करण्यासाठी ते उत्सुक आहेत. इंडोनेशियातील भारतीय स्थलांतरितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी जागतिक समस्या, जागतिक विकास, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य या विषयांवर भारताचा दृष्टिकोन मांडतील. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT