Jharkhand News Dainik Gomantak
देश

Jharkhand News: ह्रदयद्रावक! पोलिस गेले छापा मारायला अन् चार दिवसांचे बाळ बुटाने चिरडले

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Pramod Yadav

झारखंडमधील गिरिडीहमध्ये पोलिसांच्या छाप्यादरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या बुटाखाली चिरडल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मृत बाळ अवघे चार दिवसांचे होते. कुटुंबीयांच्या या आरोपानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

देवरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोशोडिंगी गावात ही घटना घडली. बुधवारी, पोलीस कोशोडिंगी गावातील एका घरात दोन जणांना अटक करण्यासाठी पोहोचले होते, जेथे शोध घेत असताना मुलाला बुटाने चिरडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

गिरिडीहचे पोलीस अधीक्षक अमित रेणू यांनी सांगितले की, एका प्रकरणात दोन जणांना अटक करण्यासाठी पोलीस एका घरात गेले असता चार दिवसांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी नवजात बालकाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य दुखापतीच्या खुणा आढळल्या नाहीत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पोलिस याबाबत अधिक काही सांगू शकतील.

डॉक्टरांचे पथक दंडाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करेल. या प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही होणार आहे. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने नवजात बालकाला चिरडल्याची कोणतीही माहिती सध्या आमच्याकडे नाही. हे आरोप खरे ठरले तर दोषी पोलिसांवर कारवाई केली जाणार नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भूषण पांडे नावाचा एक व्यक्ती सांगत आहे की बुधवारी पहाटे 3.20 वाजता पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला.

दरवाजा न उघडल्याने त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला. मी आणि घरातील बायका धावत सुटलो. पोलीस कर्मचारी ज्या खोलीत चार दिवसांचे बाळ झोपले होते त्या खोलीची झडती घेत राहिले. पोलीस कर्मचाऱ्याने मुलाला बुटाने चिरडले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT